नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या जिंदाल कंपनीत लागलेली आग आज सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा धुमसत आहे.
तब्बल 72 तास उलटल्यानंतरही ही आग पूर्णतः आटोक्यात आलेली नसून,
संपूर्ण परिसरात प्रचंड धुराचे काळे लोट आकाशात झेपावत आहेत.
Related News
‘ही’ लक्षणं जाणवत आहेत? घरीच करा थायरॉईडची ‘नेक टेस्ट’; पण ‘या’ गोष्टीकडे दुर्लक्ष करू नका
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीचा परिणाम थेट आरोग्यावर होताना द...
Continue reading
पालकापासून बनवा 4 चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ; नाश्त्यापासून जेवणापर्यंत उपयोगी, जाणून घ्या सोप्या रेसिपी
पालक ही हिरवी पालेभाजी पोषक घटकांनी समृद्ध मानली ...
Continue reading
सावधान! ड्रायव्हिंग करताना नवीन गाणी शोधण्याची सवय बेतू शकते जीवावर; रिसर्चमध्ये मोठा खुलासा
वाहन चालवताना संगीत ऐकणे अनेकांसाठी प्रवासाचा आनंद वाढवणारा ...
Continue reading
Royal Enfield Classic 350 Gorkha Edition Launch : रॉयल एनफील्ड क्लासिक 350 चे ‘गोरखा एडिशन’ लॉन्च; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
भारतीय दुचाकी बाजारपेठेत रॉयल एनफील्डच्या बाईक्सची ल...
Continue reading
Pune News : बावधनमध्ये खड्ड्यांचा कहर; पाण्याने भरलेल्या रस्त्यांतून वाट काढताना वाहनचालकांची दमछाक
‘पुणे तिथे काय उणे!’ असं मिश्कीलपणे म...
Continue reading
CM Vijay : ‘योग्य वेळी भ्रष्टाचाराची फाईल उघडीन’; मुख्यमंत्री विजय यांचा डीएमकेला थेट इशारा
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून...
Continue reading
Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंच्या FDAचा ‘हॉटेल चुल मटण’ला मोठा दणका; थेट परवाना निलंबित, काय घडलं?
राज्यातील अन्नपदार्थांची सुरक्षितता, स्वच्छता आणि अन्न भेसळीविरोधात
Continue reading
Shivsena Supreme Court Hearing : राजकीय पक्ष, विधीमंडळ पक्षात फरक काय? सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे गटाची कोंडी होणार?
शिवसेना पक्ष ...
Continue reading
Mumbai Mayor Ritu Tawde : प्रसिद्धीसाठी 25 लाखांच्या खर्चावरून वाद; रितू तावडेंनी दिलं स्पष्टीकरण, पत्र कशासाठी दिलं तेही सांगितलं
मुंबईच्या महापौर रितू...
Continue reading
Modi Cabinet Reshuffle : केंद्रात मोठ्या मंत्रिमंडळ फेरबदलाच्या हालचाली; शिंदेंनाही कॅबिनेट मंत्रिपदाची अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी ...
Continue reading
IND vs SL : भारताचा कसोटी विजय, श्रीलंकेला पहिल्या सामन्यात 165 धावांनी नमवलं
भारत आणि श्रीलंका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील...
Continue reading
आमदारांना कार, इंधन, ड्रायव्हरसाठी दरमहा 75 हजार; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय ...
Continue reading
या आगीत कंपनीतील एक संपूर्ण प्लांट आगीच्या भक्ष्यस्थानी गेला आहे.
30 ते 40 अग्निशमन बंब घटनास्थळी:
नाशिकसह ठाणे, मुंबई, मालेगाव महापालिका आणि अन्य नगरपालिकांमधून ३० ते ४० अग्निशमन गाड्या
आग आटोक्यात आणण्यासाठी पाठवण्यात आल्या आहेत. मात्र, कंपनीमध्ये वापरले जाणारे
पाणी अपुरे पडत असल्याने इतर कंपन्यांकडूनही पाण्याचा पुरवठा मागवला जात आहे.
एलपीजी टाकीचा धोका कायम:
नाशिक महापालिकेचे प्रभारी अग्निशमन अधिकारी प्रदीप बोरसे यांनी माहिती दिली की,
कंपनीच्या परिसरात एलपीजी गॅस टाकी आहे. टाकीचे तापमान वाढू नये म्हणून सतत
पाणी आणि फोमचा मारा करून तापमान नियंत्रित ठेवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
ही टाकी पेटल्यास मोठा स्फोट होऊन गंभीर अनुर्थ घडू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
एनडीआरएफ तुकडीची मागणी:
आग नियंत्रणाबाहेर जात असल्याने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शाखेकडून एनडीआरएफ
(राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल) तुकडी मागवण्यात आली आहे. पुणे येथील बेस कॅम्पशी संपर्क साधण्यात आला असून,
गुरुवारी पहाटेपर्यंत एनडीआरएफची तुकडी घटनास्थळी दाखल होण्याची शक्यता आहे,
अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी श्रीकृष्ण देशपांडे यांनी दिली.
कामगार जखमी, कंपनीत आग लागण्याची दुसरी वेळ:
या दुर्घटनेत दोन कामगार जखमी झाल्याचे कळते. विशेष म्हणजे ही आग जिंदाल कंपनीत लागलेली दुसरी वेळ आहे.
बुधवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास आगीचा भीषण भडका उडाला होता. पॉलिफिल्म तयार करण्यासाठी असलेला
कच्चा माल व रसायनांमुळे आग वेगाने पसरून अनियंत्रित झाली.
सततची आग व अपयशी नियंत्रणामुळे नागरी प्रशासनावरही प्रश्नचिन्ह:
तिसऱ्या दिवसापर्यंत आग आटोक्यात येऊ न शकल्यामुळे नागरिकांमध्ये संताप व भीतीचे वातावरण आहे.
जिवितहानी टळली असली तरी पर्यावरण व सार्वजनिक आरोग्यावर याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhakkadayak-hadpasaramadhye-22-year-old-married-hundyasathi-chha/