मुंबई | ८ मे २०२५ – मुंबईतील सर्वसामान्य प्रवाशांसाठी एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे.
बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट (बेस्ट) या उपक्रमाने बस प्रवासाच्या तिकीट दरात दुप्पट वाढ जाहीर केली असून,
९ मे २०२५ पासून हे नवीन दर लागू होणार आहेत.
Related News
अखेर युद्ध पेटलं… पाकिस्तानचे ड्रोन हल्ले निष्फळ; भारताकडून इस्लामाबाद-लाहोरवर क्षेपणास्त्रांचा मारा, कराचीवर नौदलाचा हल्ला
ऑपरेशन सिंदूर : लाहोरनंतर इस्लामाबादवर हल्ला,
रावळपिंडी स्टेडियमजवळ ड्रोन हल्ला
“वीज नाही” अशी तक्रार महागात;
चारधाम यात्रेत हेलिकॉप्टरचा अपघात;
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा डिजीटल स्ट्राइक!
वाडेगावात वादळी वाऱ्याचा कहर
संकटांशी झुंज देणाऱ्या उर्वशी संघवी यांचे प्रेरणादायी यश
ऑपरेशन सिंदूरचा परिणाम? देशभरात हवाई वाहतूक ठप्प
‘या खुदा, आज बचा लो’ – पाकिस्तानच्या संसदेत खासदाराचा भावनिक आवेग
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानची बिथरलेली कुरापत:
S-400 ‘सुदर्शन चक्र’ची किमया!
बेस्टच्या आर्थिक डबघाईमुळे हे दर वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मात्र यामुळे आधीच महागाईच्या कचाट्यात सापडलेल्या सामान्य मुंबईकरांच्या खिशावर अधिक भार पडणार आहे.
बदललेली भाडे रचना आणि मुख्य मुद्दे:
-
विना वातानुकूलित बससाठी किमान भाडे ₹५ वरून ₹१० झाले.
-
वातानुकूलित बससाठी किमान भाडे ₹६ वरून ₹१२ करण्यात आले.
-
नवीन भाडेतप्पे ५ ते ५० किमी व त्यानंतर प्रत्येक ५ किमी अंतरासाठी निश्चित.
-
दैनंदिन बसपास ₹६० वरून ₹७५ आणि मासिक पास ₹९०० वरून ₹१८०० इतका महाग.
-
५ ते १२ वयोगटातील मुलांना आता सवलतीच्या दराने प्रवास करता येणार.
-
शालेय विद्यार्थ्यांसाठीच्या पास दरात कोणताही बदल नाही.
-
महापालिका शाळांतील गणवेषधारी विद्यार्थ्यांना चालू पद्धतीप्रमाणे मोफत प्रवास सुविधा सुरु राहणार.
मुंबईत बेस्ट ही स्वस्त आणि विश्वासार्ह सार्वजनिक वाहतूक म्हणून ओळखली जाते.
अनेक नागरिक खासगी वाहतूक टाळून बेस्टचा उपयोग करत असतात.
मात्र, दरवाढीमुळे गरिब, कामगार आणि विद्यार्थी वर्गाला आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/or-god-save-today-pakistanchasa-sansadet-khasdaracha-emotional-impulse/