अरबी समुद्रात पाकिस्तानची हालचाल, युद्धनौकांवरून क्षेपणास्त्र सराव; भारतीय नौदलही उच्च सज्जतेवर

Pahalgam Attack: अरबी समुद्रात हालचालींना वेग, पाकिस्तानी युद्धनौकांकाडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव, भारतीय नौदलही सज्ज

नवी दिल्ली/इस्लामाबाद:

काश्मीरमधील पहलगाम येथे 26 भारतीय पर्यटकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या दहशतवादी हल्ल्याचा

देशभरात तीव्र संताप उमटत असताना आता भारत आणि पाकिस्तान दरम्यान

Related News

सैनिकी तणाव अधिक गहिरा होत चालला आहे. भारताने कठोर पावले उचलण्याचे संकेत दिल्याने,

पाकिस्तानच्या लष्कराने सावध भूमिका घेत अरबी समुद्रात युद्धसरावाला सुरुवात केली आहे.

पाकिस्तानकडून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव

पाकिस्तानी नौदलाने 24 ते 25 एप्रिलदरम्यान अरबी समुद्राच्या उत्तर भागात लष्करी कवायत सुरू केली आहे.

या सरावादरम्यान युद्धनौकांवरून क्षेपणास्त्र डागण्याचा सराव करण्यात येत आहे.

पाक नौदलाने व्यापारी जहाजांना सावधतेचा इशारा देत या क्षेत्रात प्रवेश न करण्याचे निर्देश दिले आहेत.

हवाई हद्दीतही चाचपणी, टेहळणी विमाने कार्यरत

पाकिस्तानी वायूदल देखील अलर्ट मोडवर असून, सीमारेषेलगत लढाऊ आणि टेहळणी विमाने गस्त घालत आहेत.

भारतीय सर्जिकल स्ट्राईक किंवा एअर स्ट्राईकची भीती पाकिस्तानला जाणवू लागली आहे.

भारताची प्रतिक्रिया – संरक्षण दल सज्ज

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका सुरू आहेत.

या घडामोडीनंतर भारतीय लष्कराच्या तिन्ही दलांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

भारतीय नौदल आणि वायूदल उच्च सज्जतेवर आहेत.

पंतप्रधान मोदींचा मार्ग बदल

पहलगाम हल्ल्याच्या वेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर होते.

दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळताच त्यांनी दौरा अर्धवट सोडून तातडीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला.

विशेष म्हणजे, भारत परतताना मोदींनी पाकिस्तानी हवाई हद्द टाळली, ही बाबही महत्त्वाची मानली जात आहे.

पाकिस्तानातही खळबळ – राष्ट्रीय सुरक्षा बैठक

भारतातील हालचाली पाहून पाकिस्तानातही चिंता वाढली असून, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी

राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर

भारताची भूमिका आक्रमक झाल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची तीव्रता वाढल्याचे दिसत आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/bharatchaya-rigorous-decision-pakistancha-khavlela-sur-starsi-language-aani-handi-haddikh-bandi-decision/

Related News