Gold Price : सोन्याच्या दरानं (Gold Price) पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठला आहे.
दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे.
Gold Price : सोन्याच्या दरानं (Gold Price) पुन्हा एकदा नवीन विक्रम गाठला आहे.
Related News
शालेय शिक्षण राज्यमंत्र्यांनी घेतला विभागाचा आढावा
सालासर बालाजी मंदिरात भव्य हनुमान जन्मोत्सव; प्रयागराज कुंभमेळ्याचा देखावा विशेष आकर्षण
तेल्हारा येथे शिवसेनेची आढावा बैठक संपन्न; स्थानिक स्वराज्य निवडणुकांची जोरदार तयारी सुरू
आठवड्यातून तीन दिवस अमरावती-मुंबई विमानसेवा सुरु
नगर परिषद शिक्षक सहकारी पत संस्था अकोटच्या अध्यक्षपदी तसलीम ताहेर पटेल यांची अविरोध निवड
शतकानुशिक परंपरेची साक्ष — आसरा माता यात्रा भक्तिभावात पार
ज्ञानेश्वर वरघट पेडगाव वार्ताहर कळंबा बोडखे येथील जनतेचा पाण्यासाठी आक्रोश
अकोला रेल्वे स्टेशन परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपी जेरबंद
शेतकरी आत्महत्या ग्रस्त निराधार बालकांना शिक्षणासाठी मदतीचा हात; माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते आर्थिक मदत वाटप
शेकडो तरुणांचा शिवसेनेत प्रवेश; अकोट तालुका आढावा बैठक उत्साहात पार
सुरत कलकत्ता हायवे क्रमांक त्रेपन्न वर भीषण अपघात; कार चालक गंभीर जखमी
गौण खनिज प्रकरणात पेंडींग असलेल्या दंडाची वसुली रखडली; तहसीलदारांवर टिका
परदेशातील मजबूत ट्रेंडमध्ये स्टॉकिस्ट आणि किरकोळ विक्रेत्यांनी सतत खरेदी केल्यामुळं,
दिल्ली एनसीआरच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 500 रुपयांनी वाढला आहे.
सध्या तिथं प्रति 10 ग्रॅम सो्यासाठी 91,250 रुपये मोजावे लागत आहेत.
गेल्या ट्रेडिंग सत्रात सोने 90750 रुपयांवर बंद झाले होते.
ऑल इंडिया बुलियन असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, सोन्याची
किंमत 500 रुपयांनी वाढून 91,250 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली आहे.
सोन्यानं दराची नवीन विक्रमी पातळी गाठली आहे. 18 मार्च रोजी 99.9 टक्के शुद्धता असलेल्या
या मौल्यवान धातूची किंमत 90,750 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. तर 99.5 टक्के शुद्धतेचे सोने 450 रुपयांनी
वाढून 90,800 रुपये प्रति 10 ग्रॅम या सार्वकालिक उच्चांकावर पोहोचले आहे.
जे आधीच्या सत्रात 90,350 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते.
सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोने एक चांगला पर्याय
सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात तसेच देशांतर्गत बाजारात नवीन विक्रम निर्माण केला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या धोरणांमुळं, अमेरिकेतील मंदीची भीती आणि
भू-राजकीय अनिश्चिततेमुळं सोने सुरक्षित गुंतवणुकीसाठी एक आकर्षक पर्याय राहिला आहे.
याशिवाय अलीकडील कमकुवत अमेरिकेच्या आर्थिक आकडेवारीनेही या वर्षी
अमेरिकन फेडरल रिझर्व्ह अनेक वेळा व्याजदरात कपात करेल, ज्यामुळे सोन्याला आणखी आधार मिळेल.”
चांदीचा भाव 1,02,500 रुपये प्रति किलोवर स्थिर झाला आहे. जो ऐतिहासिक उच्चांक आहे.
पश्चिम आशियातील अस्थिरता आणि चीनच्या अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन योजनांमुळं सोन्याच्या सुरक्षिततेची मागणी वाढत आहे.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेतील मंदीच्या वाढत्या भीतीमुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत.