IND vs NZ : भारतीय क्रिकेट टीमने आधीच चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये दमदार प्रदर्शन करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
टीम इंडियाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.
या मॅचआधी टीम इंडियाला थोडी धाकधूक असताना केएल राहुलने आता एक चांगली बातमी दिली आहे.
Related News
पुण्यात पार पडलेल्या रेवती सुळे आणि सारंग लखानी यांच्या शाही रिसेप्शन सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. पिवळ्या साडीतील रेवती सुळे यांचा साधा पण आक...
Continue reading
राजस्थानातील पचपदरा येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गत लावलेल्या रोपट्यावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शमीऐवजी प...
Continue reading
7 व्हायरल मीम्स! 'अल्फा'वर नेटकऱ्यांचा हल्लाबोल, 'बॉलिवूड नाही तर कॉपीवूड' म्हणत आलिया भट्ट ट्रोल
मुंबई : यशराज फिल्म्सच्या स्पाय युनिव्हर्समधील बहुप्रत...
Continue reading
पश्चिम बंगालच्या 3 राज्यसभा जागांवर पोटनिवडणुका
पोटनिवडणुक : देशातील अनेक भागांमध्ये मान्सूनचा जोर कायम असतानाच पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी हालचाल झाली आहे. राज्यसभेच्या तीन र...
Continue reading
इंग्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा 4 विकेट्सने पराभव करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. जेकब बेथेलची शानदार खेळी, भारतीय गोलंदाजीचा फ्लॉप शो आणि सो...
Continue reading
डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त PM मोदींचे मोठे विधान; कलम 370 रद्द करणे हीच खरी श्रद्धांजली, जाणून घ्या 7 महत्त्वाचे मुद्दे
भारतीय जनसंघाचे संस्थापक
Continue reading
तेलंगणातील करीमनगर येथे 55 वर्षीय महिलेला कामाच्या बहाण्याने शेतात नेऊन दागिने लुटल्यानंतर विहिरीत ढकलण्यात आले. तब्बल 21 तास मृत्यूशी झुंज देत महिलेने...
Continue reading
दिल्लीतील 28 वर्षीय आकृती सुतार हिचा लग्नानंतर अवघ्या अडीच महिन्यांत संशयास्पद मृत्यू झाला. ऑफिसमध्ये पार्टी करून घरी निघालेल्या आकृतीच्या मृत्यूनंतर कु...
Continue reading
Lock Upp 2 : ‘गरिबांनी जास्त मुलं जन्माला घातली तर गरिबी वाढते’; माधुरी जैनच्या वक्तव्याने पेटला वाद, सोशल मीडियावर संताप
मुंबई : रिअॅलिटी शो 'Lock Upp...
Continue reading
प्रेयसीला भेटण्यासाठी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधून LoC ओलांडून भारतात आलेल्या जीशान अहमद मीरला महिनाभरानंतर पाकिस्तानात परत पाठवण्यात आले. जाणून घ्या त्याच...
Continue reading
पृथ्वी शॉ-आकृती अग्रवालचे नाते तुटले? 'विश्वासघात' पोस्ट, फोटो डिलीट आणि अनफॉलोनंतर चर्चांना उधाण
भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि सोशल मीडिया इन्फ्ल...
Continue reading
‘सिया पॉइंट’ पाहण्यासाठी लोहगडावर वाढली गर्दी; ऐतिहासिक वारशाच्या संरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांकडे थेट धाव
मुंबई : पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध ऐतिहासिक...
Continue reading
टीम इंडियाचे फॅन्स सध्या आनंदात आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया दमदार प्रदर्शन करत आहे.
न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी मालिकेत झालेल्या दारुण पराभवाच दु:ख त्यामुळे थोडं कमी झालं आहे.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
भारतीय फॅन्सना आता आणखी एक चांगली बातमी मिळालीय. केएल राहुने ही बातमी दिलीय.
विकेटकिपिंगची जबाबदारी संभाळणाऱ्या केएल राहुलने सांगितलं की,
“साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यासाठी कॅप्टन रोहित शर्मा
आणि स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी फिट आहे”
दुबईमध्ये रविवारी 2 मार्चला टीम इंडियाचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होणार आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मधील हा शेवटचा सामना आहे.
भारत आणि न्यूझीलंड दोन्ही टीम्स सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत.
पण या सामन्याचा निकाल ठरवेल की, कोणती टीम पहिला सेमीफायनलचा सामना खेळणार.
हा सामना फक्त औपचारिकता मात्र नाहीय. महत्त्वाची मॅच आहे ही.
टीम इंडियाला पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरावं लागणार आहे.
त्या बाबतीत टीम इंडिया कुठलाही धोका पत्करणार नाही
रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी हे दोन्ही दिग्गज पूर्णपणे फिट आहेत.
त्यामुळे मॅचच्या एकदिवस आधी टीम इंडियाला दिलासा मिळाला आहे.
शुक्रवारी 28 फेब्रुवारीला टीम इंडियाने पत्रकार परिषद बोलावलेली.
त्यात केएल राहुलने दोघांच्या फिटनेसच्या प्रश्नावर हे उत्तर दिलं. “रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल
कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.
दोघेही शेवटच्या सामन्यासाठी उपलब्ध आहेत” असं केएल राहुल म्हणाला.
दोन्ही दिग्गजांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश होईल का? किंवा सेमीफायनलचा विचार
करुन आराम देण्यात येईल तो खुलासा राहुलने केला नाही.
रोहित आणि शमीच्या बाबतीत टीम इंडिया कुठलाही धोका पत्करणार नाही.
त्यांना आराम देऊ शकते अशी शक्यता आहे.
काय त्रास झालेला?
पाकिस्तान विरुद्ध 23 फेब्रुवारीला झालेल्या सामन्याच्यावेळी रोहितला
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीचा सामना करावा लागला होता. त्यामुळे भारतीय कर्णधार बराचवेळ
मैदानाबाहेर होता. त्यावेळी उपकर्णधार शुभमन गिलने जबाबदारी संभाळली होती.
रोहितनंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र, तरीही त्याच्या फिटनेसबद्दल संशय कायम आहे.
दुसऱ्याबाजूला स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सुद्धा फिटनेस समस्येचा सामना करावा लागला.
त्याला गुडघ्याचा त्रास जाणवत होता. त्यामुळे सुरुवातीच्या 3-4 ओव्हरनंतर तो बराचवेळ मैदानाबाहेर होता.
त्यानंतर त्याने मैदानावर येऊन आपला स्पेल पूर्ण केला. बांग्लादेश विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने सर्वाधिक 5 विकेट काढल्या होत्या.
Read more news here : https://ajinkyabharat.com/hi-ray-summer-mumbai/