Tim Seifert Hit 4 Sixes In One Over Of Shaheen Afridi : पाकिस्तानी गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजने
एकाच ओव्हरमध्ये 4 षटकार लगावल आहेत.Tim Seifert Hit 4 Sixes In One Over Of Shaheen Afridi :
न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना डुनेडिन येथील ओव्हरच्या मैदानावर खेळवण्यात आला होता.
Related News
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
सातपुड्याच्या पायथ्याशी हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर; शेतकऱ्यांची दहशत
तुमचे वैयक्तिक आरोग्य उत्तम राहण्यासाठी काय करावे?
सासरी आलेल्या महिलेचं घर जाळून टाकल्याची घटना विचित्र प्रकारे घडली आहे,
सावरा येथे भीषण आग; दोन जनावरांचा मृत्यू, घराची राख
या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहिन आफ्रिदीला न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगलाच धुतलाय.
पाकिस्तानकडून तिसरं षटक टाकण्यासाठी आलेल्या शाहिन आफ्रिदीच्या पहिल्या बॉलवर सेफर्टने फ्रंटफुटवर
येऊन जोरदार षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरही त्याने याच प्रकारे षटकार मारला.
ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सेफर्टला कोणताही रन घेता आला नाही. चौथ्या चेंडूवर सेफर्टने दोन धावा पळून काढल्या.
त्यानंतर षटकातील शेवटच्या दोन चेंडूवर सेफर्टने पुन्हा षटकार लगावले. आफ्रिदी या सामन्यात महागडा गोलंदाज ठरलाय.
त्याने एकाच षटकात 26 धावा दिल्या.
टिम सेफर्टचं अर्धशतक हुकलं
संपूर्ण सामन्यात टिम सफर्टने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, टी 20 क्रिकेटमधील
10 वे अर्धशतक झळकवेल, असं वाटत असताना तो 45 धावांवर बाद झाला.
त्याने 22 चेंडूमध्ये 204.55 स्ट्राईक रेटने 45 धावा कुटल्या. यावेळी त्याने एकूण 3 चौकार आणि 5 षटकार लगावले.
दरम्यान, पाकिस्तानचा गोलंदाज मोहम्मद अली याने त्याला बाद केले.
शाहिन अफ्रिदीच्या 3 षटकांमध्ये 31 धावा कुटल्या
शाहीन आफ्रिदीच्या कामगिरीबद्दल सांगायचे तर, दुसऱ्या टी-20 सामन्यात त्याने
एकूण तीन षटके टाकली. दरम्यान, त्याने 6.70 च्या इकॉनॉमीसह 31 धावा केल्या.
मात्र त्याला काही यश मिळाले नाही.
न्यूझीलंडचा पाकिस्तानवर दणदणीत विजय
ड्युनेडिनमध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तान संघाने पावसाने प्रभावित झालेल्या सामन्यात
15 षटकांत नऊ गडी गमावून 135 धावा केल्या. विरोधी संघाने दिलेले 136 धावांचे लक्ष्य किवींच्या
संघाने 13.1 षटकांत पाच गडी गमावून सहज गाठले.
सामन्यादरम्यान सेफर्टने 22 चेंडूत 45 धावांचे योगदान दिले तर फिन ऍलनने 16 चेंडूत 38 धावांचे योगदान दिले.