अकोला: कावड यात्रेच्या नियोजनाबाबत २ ऑगस्टला बैठक

श्रावण

श्रावण महिन्यातील कावड व पालखी उत्सवाच्या

मिरवणूक मार्ग, सुव्यवस्था आदी नियोजनाबाबत

जिल्हा दंडाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

Related News

नियोजन भवनात २ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

श्रावणाला ५ ऑगस्टपासून सुरुवात होणार असून,

या काळात अकोला जिल्ह्यात शहरी, तसेच ग्रामीण भागात कावड

व पालखी उत्सव साजरा करण्यात येतो.

श्रावणात ५ ऑगस्टला पहिला, १२ ऑगस्टला दुसरा,

१९ ऑगस्टला तिसरा (श्रीक्षेत्र धारगड यात्रा) आणि २६ ऑगस्टला

चौथा श्रावण सोमवार येतो. या कालावधीत भाविक गांधीग्राम येथील

पूर्णेच्या पात्राजवळ मोठ्या संख्येने एकत्र येतात व कावड जलाने भरून

श्री राजराजेश्वर मंदिरात महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करतात.

या उत्सवाच्या अनुषंगाने शहरात आपातापा नाका, रेल्वे पूल, शिवाजी महाविद्यालय,

अकोट स्टँड, मामा बेकरी, बियाणी चौक, कापड बाजार, सराफा लाइन,

गांधी चौक, कोतवाली चौक, लोखंडी पूल, काळा मारोती वळण,

जयहिंद चौक ते राजराजेश्वर मंदिरापर्यंत कायदा व सुव्यवस्था, बंदोबस्त

तसेच इतर आपत्कालीन सोयी-सुविधा पुरविणे आवश्यक आहे.

त्यादृष्टीने बैठकीत चर्चा होणार आहे. विविध विभागांचे अधिकारी व कावड पालखी,

शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी बैठकीला उपस्थित राहतील.

Read also: https://ajinkyabharat.com/akola-farmers-still-waiting-for-peak-loan/

Related News