श्रीकांत पाचकवडे
अकोला : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत गत निवडणुकीच्या तुलनेत यंदा दंड थोपटून आमने-सामने उभे ठाकलेल्या भाजप विरुद्ध काँग्रेस मध्ये काट्याची टक्कर झाली आहे. त्यामुळे मतदानानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचा दावा केल्या जात असुन केंडर बेस भाजपमध्ये फिलगुडचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे भाजप विरुद्ध काँग्रेसच्या लढतीत वंचीत विजयाचा मार्ग सुकर करेल कां? असाही कयास लावल्या जात आहे.
देशात लोकसभेच्या 18 व्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अकोला लोकसभा मतदारसंघासाठी शुक्रवारी (ता.26) मतदान घेण्यात आले. गत निवडणुकीत या मतदारसंघात सरासरी 60 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी भाजप विरुद्ध वंचीत अशी थेट लढत होऊन काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेली होती.
Related News
बॉलीवूडची सदाबहार अभिनेत्री हेलेन या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत,
पण यावेळी त्यांच्या सिनेमामुळे नव्हे, तर त्यांच्या फिटनेस आणि जिंदादिलीमुळे. ८६ वर्षांच्या वयातही
हेलेन यांनी ...
Continue reading
गुजरात ATS ने नुकताच एक धक्कादायक खुलासा करत देशात सुरू असलेल्या सायबर गुप्तहेरगिरीच्या
मोठ्या मॉड्यूलचा भांडाफोड केला आहे. या कारवाईत नाडियाड (गुजरात) येथून जसीम शाहनवाज अन्सारी...
Continue reading
अकोला –
शहरातील नवीन एसटी बस स्थानक चौकात आज दुपारी एक धक्कादायक प्रकार घडला.
बस टी पॉइंट जवळून अशोक वाटिकेकडे जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी
बसच्या मागील बाजूस एक ...
Continue reading
शिवर गावात आज जागतिक शून्य सावली दिन पारंपरिक वारकरी परंपरेने आणि संत
विचारांच्या प्रचार-प्रसाराने भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला.
श्री संत गजानन महाराज सेवा समिती, शिवर यां...
Continue reading
पृथ्वीवर मकरवृत्ताच्या दक्षिणेकडील आणि कर्कवृत्ताच्या उत्तरेकडील भागांत
सूर्य कधीच पूर्णपणे डोक्यावरून जात नाही. मात्र या दोन वृत्तांमधील स्थानिकांना वर्षातून
दोन वेळा सूर्य नेमक...
Continue reading
उत्तर भारतात प्रचंड उन्हामुळे हैराण झालेल्या नागरिकांना थोडी हवामान बदलाची दिलासा मिळणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २४ मे रोजी (शनिवार) आणि पुढील दोन दिवस दिल्ली-ए...
Continue reading
वाराणसी (उत्तरप्रदेश) – पाकिस्तान आणि POK मधील दहशतवादी तळांवर भारतीय सेनेने केलेल्या
‘ऑपरेशन सिंदूर’ कारवाईचा ठसा आता फक्त रणांगणातच नव्हे तर बनारसच्या हातमागावरही उमटला आहे.
ये...
Continue reading
पाटणा (बिहार): पाटणा-जयनगर दरम्यान ‘नमो भारत’ (वंदे मेट्रो) ट्रेन सुरू झाल्यानंतर
आता बिहारमधील दुसऱ्या मार्गावरही ही हायटेक वातानुकूलित ट्रेन धावण्याची शक्यता आहे.
पाटणा ते गयाज...
Continue reading
मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रावर निसर्गाचा प्रचंड तडाखा बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून,
हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई...
Continue reading
नवी दिल्ली : भारताने सिंधू पाणी करारातील काही अटी निलंबित केल्यानंतर पाकिस्तानकडून
पुन्हा एकदा उर्मट प्रतिक्रिया समोर आली आहे. पाकिस्तानच्या लष्करातील लेफ्टनंट जनरल
अहमद शरीफ चौध...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी): "बडे बाप का बेटा" असला तरी तुरुंगात सगळ्यांना सारखंच वागवलं जातं,
असं सूचित करत खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानच्या मुलगा आर्यन खानच्या
तुरुंगातील वास्तव...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी): अकोट नगर परिषद क्षेत्रातील थकीत मालमत्ताधारकांसाठी राज्य शासनाने दिलासादायक निर्णय घेतला असून,
मालमत्ता करावरील ५० टक्के शास्ती माफ करण्यासाठी प्रोत्साहनात्मक अभ...
Continue reading
यंदा मात्र, भाजपच्या मराठा कार्डला काँग्रेसने मराठा कार्डनेच उत्तर दिल्याने मतदारसंघात सत्ताधारी भाजपचे अऩुप धोत्रे विरुद्ध काँग्रेसचे डॉ. अभय पाटील यांच्यातच थेट लढत झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. मतदारसंघातील राजकीय समीकरण पाहता बाळापुर, अकोला पश्चिम, रिसोड मतदारसंघात काँग्रेसने हात मारल्याची चर्चा आहे. तर अकोला पुर्व, अकोट, अकोला पश्चिमचा काही भागात कमळ फुलल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. भाजप आणि काँग्रेसच्या या लढतीत वंचीत बहुजन आघाडीनहेी सोशल इंजिनिअरिंगचा फंडा यशस्वी करण्यावर भर दिल्याचे बोलल्या जाते.
या निवडणुकीत बाळापूर मतदारसंघ हा निर्णायक भुमिकेत असुन या मतदारसंघात मराठा, कुणबी, मुस्लीम, बौद्ध, माळी समाजाचे प्राबल्य आहे. या मतदारसंघाचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी दिल खोलके डॉ. अभय पाटलांना साथ दिल्याने अकोला लोकसभा मतदारसंघात सर्वांधिक 66.58 टक्के मतदान बाळापुर मतदारसंघात झाल्याचे पहावयास मिळाले.
एकदंरीत काही मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत तर काही ठिकाणी तिरंगी लढत झाल्याने विजयाचे दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. सध्या तरी प्रमुख पक्षाचे कार्यकर्ते आपलाच उमेदवार विजयी होईल, असे दावे करीत असले या निवडणुकीत मतदारराजा कोणाला लोकसभेत पाठवतो? हे चार जुनला जाहीर होणाऱ्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.