सोनं वाढता वाढता झपाट्याने वाढे; सोन्याच्या दरात वर्षभरात तब्बल प्रतितोळा 22,000 रुपयांची वाढ

सोन्याच्या दरात होणारी वाढ पाहता, रिअल इस्टेट किंवा बँकेतील एफडीच्या गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा देणारी ठरत आहे. त्यामुळे, ग्राहकांकडून सोनं खरेदीला जोर आला आहे.

सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून 88 हजार रुपये तोळा म्हणजेच

10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल 88 हजार रुपये मोजावे लागत आहेत.

त्यामुळे, सोनं खरेदी करणं आता गोरगरिबांचं काम राहिलं नाही.सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली असून 88 हजार रुपये

Related News

तोळा म्हणजेच 10 ग्रॅम सोन्यासाठी तब्बल 88 हजार रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे, सोनं खरेदी करणं

आता गोरगरिबांचं काम राहिलं नाही.गेल्या दोन वर्षभराचा विचार केला तर सोन्याच्या दरात दिवसागणिक मोठी वाढ होत

असल्याचं पाहायला मिळत आहे. सोन्याच्या या वाढत्या दरामुळे, गुंतवणूकदारांना बँकेच्या व्याजदरापेक्षा सोन्याच्या दरात मोठा परतावा मिळत

असल्याचे दिसून येते.सोन्याच्या दरात होणारी वाढ लक्षात घेऊन अनेक ग्राहकांनी बँकेत पैसे ठेवण्यापेक्षा सोन्याचे नाणे खरेदी करून,

सोन्यात गुंतवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळत आहे.सोन्याच्या दरात मागील काही वर्षात झपाट्याने वाढ झाली आहे.

गेल्या तीन महिन्यात सोन्याच्या दरात 15 हजार रुपयांची तर वर्षभरात तब्बल 22 हजार रुपयांची वाढ झाल्याचे दिसून येते.

जागतिक पातळीवर युद्धजन्य परिस्थितीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेक गुंतवणूकदारांनी, सोन्यामध्ये गुंतवणूक केल्याने,

सोन्याच्या मागणीत मोठी वाढ होऊन त्याचा परिणाम सोन्याच्या किमतीवर झाल्याचं पाहायला मिळत आहे.

गेल्यावर्षी जीएसटीसह 76,000 हजार रुपयांवर प्रति तोळा असलेलं सोनं आज 91,000 हजार रुपयांवर पोहोचले आहे.

त्यामुळे, गेल्या वर्षभरात तब्बल 15000 रुपयांची वाढ झाल्याचं दिसून येत आहे.अजूनही सोन्याचे दर वाढतच राहतील असा अंदाज असल्याने,

जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्याचे दागिने खरेदी करण्यासोबत, सोन्याचे नाणे खरेदी करून गुंतवणूक करण्याकडे ग्राहकांचा कल

असल्याचं पाहायला मिळत आहे.सोन्याच्या दरात होणारी वाढ पाहता, रिअल इस्टेट किंवा बँकेतील

एफडीच्या गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा देणारी ठरत आहे. त्यामुळे, ग्राहकांकडून सोनं खरेदीला जोर आला आहे.

 

Related News