Nagpur: नागपुरातील राड्यात तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे. यात पोलिसांचे तीन
डीसीपी दर्जाचे अधिकारी यात गंभीर जखमी झाले असून त्याचावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
Nagpur Violence : छत्रपती संभाजीनगरमध्ये असलेल्या (Chhatrapati Sambhajinagar)
Related News
अकोला | प्रतिनिधी
दिनांक ६ एप्रिल २०२५ रोजी श्रीराम नवमीच्या शुभमुहूर्तावर अकोला शहरात विविध धार्मिक
कार्यक्रम आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे.
श्रीराम मंदिरासह संपूर्ण श...
Continue reading
कळंबी महागाव | प्रतिनिधी
अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील ग्राम लोहारा येथील सर्वज्ञ विद्या मंदिर येथे
वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वल...
Continue reading
मुंबई | लाइफस्टाइल डेस्क: सध्या ताणतणावाचं आणि धकाधकीचं जीवन जगताना
अनेकांना डोळ्यांखालची काळसर वर्तुळे ही सामान्य पण त्रासदायक समस्या वाटू लागली आहे.
ही समस्या केवळ सौंदर्यावर प...
Continue reading
मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी कोर्टात
करुणा शर्मा यांच्याशी संबंधाबाबत मोठा दावा करत खळबळ उडवून दिली आहे.
करुणा शर्मा या धन...
Continue reading
आज समाजात आभासी जीवनाला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समाज माध्यमाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
सिनेमातील, स्वप्नातील जीवन सत्यात उतरावे असे प्रत्येकाला वाटते.
यामुळे न...
Continue reading
अकोट | प्रतिनिधी
अकोट शहरातील शनिवारा (मोठी मढी) येथे नुकताच माळी महासंघाच्या नामफलकाचे उद्घाटन व नविन
पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन...
Continue reading
मुंबई (प्रतिनिधी):
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर सुरू असलेले
बँकांमधील आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या ...
Continue reading
शिर्डी मध्ये नुकत्याच झालेल्या भिकारी यांच्या धडपडीमध्ये 50 पेक्षा जास्त भिकाऱ्यांना पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतले होते.
यामध्ये काही भिकारी तर चक्क इंग्रजीमध्ये भीक मागताना...
Continue reading
अकोट (प्रतिनिधी):
येणाऱ्या सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तसेच आतंकवादी हल्ल्यासारख्या आपत्कालीन
परिस्थितीत पोलीस यंत्रणेचा प्रतिसाद आणि तयारीची चाचणी घेण्यासाठी,
अकोट शहर पोलिसां...
Continue reading
उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहा...
Continue reading
माना (प्रतिनिधी - उद्धव कोकणे):
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या एन.एम.एम.एस (NMMS) शिष्यवृत्ती
परीक्षेची गुणवत्ता यादी नुकतीच जाहीर झाली असून, जिल्हा परिषद...
Continue reading
मूर्तिजापूर (प्रतिनिधी): अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव येथे
सायंकाळच्या सुमारास एका शेतकरी कुटुंबावर धाडसी दरोडा टाकण्यात आला.
या घटनेत लाखों रुपयांची रोकड व अ...
Continue reading
औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाकडून सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनाला नागपूरमध्ये
हिंसक वळण लागले आहे. सोमवारी संध्याकाळी नागपूरमध्ये (Nagpur News) दोन गटांमध्ये दगडफेक झाल्याने हिंसाचार उफाळला.
यामध्ये अनेक गाड्यांची जाळपोळ करण्यात आली. नागपूरच्या महल परिसरापासून काही अंतरावर असणाऱ्या चिटणीस पार्क
परिसरातही याची झळ पोहोचली. ‘एबीपी माझा’ने येथील नागरिकांशी संवाद साधला तेव्हा त्यांनी भयावह अनुभव सांगितला.
तर दुसरीकडे, जमाव पांगवण्यासाठी गेलेल्या कर्तव्य पथावरील पोलीस आणि अग्निशमन दलाच्या पथकातील अनेकांनाही जबर मार बसला आहे.
यात प्रामुख्याने तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो पोलीस कर्मचारी जखमी झाले आहे.
नागपूर पोलिसांचे तीन डीसीपी दर्जाचे अधिकारी यात गंभीर जखमी झाले असून त्याचावर सध्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.
तीन पोलीस आयुक्तांसह शेकडो जण जखमी
पुढे आलेल्या माहितीनुसार, निकेतन कदम यांच्या हातावर कुऱ्हाडीचा वार झाल्यामुळे ते काल रात्री रक्तबंबाळ झाले होते.
त्यात ते गंभीर जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल झालेत.
तर जमावाकडून करण्यात आलेल्या दगडफेकीच्या घटनेत डीसीपी शशिकांत सातव यांचा पाय फ्रॅक्चर झाला
आहे तेही रुग्णालयात दाखल झाले आहेत. तर डीसीपी अर्चित चांडक यांना गंभीर लिगामेंटल इंज्यूरी झाली होती.
त्यानाही रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे.
तर डीसीपी राहुल मदने यांनाही दगडाचा वार बसला होता. मात्र ते सध्या कर्तव्यावर हजर असल्याची माहिती पुढे आली आहे.
संचारबंदी लागू , शाळा आणि महाविद्यालय बंद
नागपुरातील चिटणीस पार्क, भालदारपुरा, महाल, शिवाजी चौक, हंसापुरी या भागात काल रात्री अशांतता निर्माण होऊन
प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाली असली तरी परिसरातील काही बँक आज नियमित वेळेवर उघडण्यात आल्या आहे.
महाल परिसरातील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा कर्मचाऱ्यांनी नियमित वेळेवर येऊन उघडली आहे.
आम्हाला आज बँक उघडी ठेवण्याच्या सूचना असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव दक्षता म्हणून परिसरातील शाळा आणि महाविद्यालय बंद आहेत.
बाजारपेठा संचारबंदी लागू असल्यामुळे पूर्णपणे बंद आहेत.
आता हळूहळू पोलिसांनी वेगवेगळे रस्तेही बंद करायला सुरुवात केली आहे.
Read more news here : https://ajinkyabharat.com/