Eknath Shinde : औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून राज्यातील वातावरण सध्या तापले आहे.
ही कबर हटवावी अशी मागणी केली जात आहे.
Eknath Shinde : सध्या राज्यात खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे.
Related News
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारीत आठ जण जखमी झाल्याची धक्कादायक घटना अकोल्यातील कृषी नगर भागात घडली आहे. दोन गटात झालेल्या या वादात गोळीबार झाल्याची माहिती आह...
Continue reading
राज्यातील शासकीय रुग्णालयातील परिचारिकांच्या विविध मागण्यांबाबत कोणताही अंतिम निर्णय न झाल्याने त्यांनी आज गुरूवारी काम बंद आंदोलन केलेये. या आंदोलनात अकोला येथील शासकीय वैद्यकीय म...
Continue reading
‘एक जिल्हा, एक उत्पादन - 2024’ मध्ये महाराष्ट्राला ‘अ’ श्रेणीत सुवर्णपदक मिळालाय..तर अकोल्याच्या कापूस उत्पादनांना राष्ट्रीय ओळख मिळाली आहेय..कापूस प्रक्रिया उद्योगासाठी
अकोल्या...
Continue reading
अकोट : अजिंक्य भारत ने 10 जुलै रोजी पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या अडगाव खुर्द गट ग्रामपंचायत मधील कातखेडा,
पिंपळखुटा गावामध्ये नागरिकांना मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने सर्व...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
बुधवार दि16/07/25 रोजी ता मंगरूळपिर मधून प्राथमिक आरोग्य केंद्र शेलुबाजार येथे संशयित क्षयरुग्नाचे तपासणी शिबिर
घेण्यात आले यामध्ये डिजिटल मशीनद्वारे संश...
Continue reading
शेलुबाजार वार्ता :-
मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या
सहा महिने ते एक...
Continue reading
वाडेगाव:- ग्राम पंचायत समोर गेल्या दोन दिवसा पासून आमरण उपोषण करत असलेले
शे दस्तगीर शे महेमुद देगाव येथील यानी लेखी तक्रारारी मधे काशीराम तुळशीराम गव्हाळे यांचे शेत
गट क्र २७...
Continue reading
दहीहंडा परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून यामुळे
नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे.
रस्त्याची दुरवस्था पाहता सामाजिक कार्यकर्ते प...
Continue reading
अकोला जिल्ह्यात गेल्या चार दिवसापासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज पुन्हा एकदा रिमझिम पावसाने
हजेरी लावली असून या रिमझिम पावसातही शेतीच्या मशागतीचे काम सुरू असल्याचे चित्र प...
Continue reading
अकोट
दि.०९/०७/२०२५ रोजी फिर्यादी सौ.निर्मला मानिक सोळंके वय ६२ वर्षे रा.माना ता. मुर्तीजापुर जिल्हा अकोला
यांनी पोलिस स्टेशन ला येवुन रिपोर्ट दिला की,ते दि.०२/०७/२०२१ रोजी त्या...
Continue reading
भाजप नेत्याच्या तक्रारीवरून अकोल्यात "बांगलादेशी" असल्याच्या कारणावरून २८०० लोकांचे जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे,
ज्यामध्ये सर्व धर्म आणि जातींचे लोक समाविष्ट आहेत. हे ल...
Continue reading
लंडन
इंग्लंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताला 193 धावांचं लहानसं लक्ष्य मिळालं होतं,
मात्र भारतीय फलंदाजांनी निराशा केली आणि लॉर्ड्सवर टीम इंडियाचा दारूण पराभव झाला.
यामुळे...
Continue reading
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेली ही कबर हटवावी, अशी मागणी वेगवेगळ्या संस्था, संघटनांकडून केली जात आहे.
राज्यातील काही पक्ष आणि राजकीय नेत्यांनीही ही मागणी लावून धरली आहे.
विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात नसावी, अशी भूमिका घेतली आहे.
त्यानंतर औरंगजेबाच्या कबरीचा हाच मुद्दा आता थेट दिल्लीदरबारी पोहोचण्याची शक्यता आहे.
खुद्द एकनाथ शिंदेच केंद्रीय नेतृत्त्वाशी या मुद्द्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे दिल्लीच्या नेतृत्त्वाशी चर्चा करणार?
मिळालेल्या माहितीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
या दिल्लीवारीत ते औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा केंद्रीय नेतृत्त्वाकडे उपस्थित करण्याची शक्यता आहे.
राज्यात सध्या औरंगजेबाच्या कबरीचा मुद्दा तापलेला असताना शिंदे यांच्या या दिल्लीवारीला चांगलेच महत्त्व आले आहे.
खरं म्हणजे एकनाथ शिंदे हे केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात सहभागी होणार आहेत.
या सोहळ्याला हजेरी लावल्यानंतर ते दिल्लीतील नेतृत्वाशी बातचीत करण्याची शक्यता आहे.
याच भेटीत ते महाराष्ट्रातील औरंगजेबाची कबर हटवण्याचा मागणीबाबत केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
मुक्तगिरी येथील पक्षप्रवेशानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला होतील रवाना होणार आहेत.
एकनाथ शिंदे यांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे?
विश्व हिंदू परिषदेसारख्या संघटनांकडून राज्यभरात औरंगजेबाची कबर हटवावी, ही मागणी घेऊन आंदोलन केले जात आहे.
याच मुद्द्यावर शासनाच्या वतीने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 17 मार्च रोजी पहिल्यांदाच भूमिका मांडली होती.
औरंग्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे, अशी शिवभक्तांची मागणी आहे. माझीही हीच भावना आहे,
असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. औरंगजेब महाराष्ट्राचा दुष्मन होता, राष्ट्रद्रोही होता, त्याची निशाणी महाराष्ट्रात कशाला पाहिजे.
जे औरंगजेबाचे उदात्तीकरण करतात, त्यांना निषेध केला पाहिजे अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली होती.