लोकमान्य टिळक यांच्या चतुःसूत्रीतील स्वदेशीच्या अनुषंगाने
मानवी व सामाजिक विकासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या
ज्येष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.
Related News
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
माधुरी दीक्षित आणि डॉ. शिरीराम नने : अमेरिकेतील शांत जीवनानंतर भारतात परतण्यामागील कथा
बॉलिवूडची ‘नृत्याची राणी’ माधुरी दीक्षित हे 1990 च्या दश...
Continue reading
लहान मुलांना सर्दी-खोकला झाल्यास वाफ देणे योग्य की अयोग्य? डॉक्टर हिमांशू भदानी यांचा सल्ला
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला की लहान मुलांमध्ये सर्दी-खोकला
Continue reading
सावधान! प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिणे होऊ शकते गंभीर आजाराचे कारण
आजकाल आपण सर्वच प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर करतो, विशेषतः पाणी, रस, सॉफ्ट ड्र...
Continue reading
जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक यांचे लिखाण आजही प्रेरणादायी – अकोट तालुक्यात स्मृतिदिन कार्यक्रम
अकोट: जेष्ठ पत्रकार स्व. सुधीर पाठक
Continue reading
जागतिक स्तरावर चमकलेले 4 भारतीय पदार्थ : अमृतसरी कुलचा, बटर चिकन, ह्यदराबादी बिर्याणी आणि शाही पनीर ‘टेस्ट अॅटलस’च्या टॉप १०० पदार्थांच्या यादीत स्थान मिळवले
भारतीय खाद्यसंस्कृती ...
Continue reading
चाणक्य नीती: असे लोक जर तुमच्या घरात असतील, तर सावधान! तुमच्या जीवाला धोका असू शकतो
चाणक्य नीती: आयुष्यात प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची इच्छा असते, पण कधी कधी आपल्या घ...
Continue reading
मोत्याची अंगठी घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत – ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने मार्गदर्शन
आजकाल फॅशन आणि सौंदर्याच्या दृष्टीने अंगठी, हार किंवा इतर दागिन...
Continue reading
महिलां नी रोज किती प्रोटीन घ्यावे? निरोगी राहण्यासाठी जाणून घ्या
सध्याच्या काळात महिलां चे आरोग्य अधिक महत्त्वाचे झाले आहे. कामकाज, घरकाम, व्यायाम आणि ...
Continue reading
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (टिळक स्वराज्य संघ)
वतीने शनिवारी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली.
लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे विश्वस्त डॉ. रोहित टिळक यांनी
शनिवारी पत्रकार परिषदेत या पुरस्काराची घोषणा केली.
गुरूवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक यांच्या
104 व्या पुण्यतिथीनिमित्त नवी दिल्ली येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
महाराष्ट्र सदनात सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या सोहळ्यात
सुधा मूर्ती यांना टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक
यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावेळी ज्येष्ठ नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार,
खासदार डॉ. शाहू छत्रपती महाराज, केरळचे माजी गृहमंत्री रमेश चेन्निथला
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तसेच डॉ. गीताली टिळक, डॉ. प्रणति रोहित टिळक
यांच्यासह ट्रस्टचे अन्य विश्वस्त यावेळी उपस्थित असतील.
स्मृतिचिन्ह आणि एक लाख रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात.
कर्नाटक सरकारच्या सर्व शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत.
त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात ‘मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया’ या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे.
कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगळुरू शहर व परिसरात त्यांनी
सुमारे 10,000 स्वच्छतागृहे संस्थेच्या माध्यमातून उभारली.
तामिळनाडू आणि अंदमान येथे त्सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले.
महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील रहिवाशांनाही संस्थेने मदत दिलेली आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/pm-modi-to-visit-ukraine-next-month/