जितापूरमध्ये वाघाचा कहर! सलग तिसऱ्या हल्ल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे सावट, वन विभागावर रोष
जितापूर परिसरात पुन्हा एकदा वाघाच्या हल्ल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिनांक २६ ऑक्टोबर रोजी सकाळच्या दरम्यान वाघाने शेतकरी गजानन मंगळे यांच्या गाईवर हल्ला करून तिची शिकार केली. या हल्ल्यात गाईचा जागीच मृत्यू झाला असून, परिसरात पुन्हा एकदा भीतीचे सावट पसरले आहे.
विशेष म्हणजे, ही सलग तिसरी घटना असून याआधीही वसुबारसच्या दिवशी मंगळे यांच्या घराशेजारील गोठ्यातून वाघाने शिकार केली होती. या सततच्या हल्ल्यांमुळे जितापूर, शेलगाव, आणि जवळील खेड्यांतील शेतकऱ्यांमध्ये तीव्र दहशत निर्माण झाली आहे.
Related News
गावातील नागरिकांनी सांगितले की, आता लहान मुलांना घराबाहेर न सोडण्याचा इशारा पालकांनी दिला आहे. संध्याकाळीच गावात संचारबंदीचे वातावरण असून, शेतात काम करतानाही शेतकरी भयभीत आहेत.
दरम्यान, गावकऱ्यांचा वन विभागावर तीव्र रोष आहे. “कागदी पंचनामे आणि नुकसानभरपाईच्या नावाखाली वन विभाग फक्त भोपळा देतोय,” असा आरोप संतप्त ग्रामस्थ करत आहेत. त्यांनी त्वरित वाघाचा बंदोबस्त करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.
ग्रामस्थांनी चेतावणी दिली आहे की, जर वन विभागाने योग्य ती कार्यवाही केली नाही तर गाव बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
read also : https://ajinkyabharat.com/vijecha-dhak-basun-kamgarcha-death-2-lahan-mulinwar-aichi-responsibility/
