शालेय अभ्यासक्रमात ‘साप आणि वन्यजीव’ माहितीचा समावेश करा – वनिता बोराडे यांची शासनाकडे आग्रही मागणी

वनिता बोराडे

जगातील पहिल्या महिला सर्परक्षक आणि सर्पतज्ज्ञ, वनिता बोराडे यांनी राज्य शासन, शिक्षण आणि वन विभागाकडे शालेय शिक्षण अभ्यासक्रमात साप आणि वन्यजीव यांची वैज्ञानिक व शास्त्रीय माहिती समाविष्ट करण्याची आग्रही मागणी केली आहे. त्यांचा असा असा आग्रह आहे की, मुलांना लहानपणापासूनच सापांविषयी योग्य माहिती देऊन भीती, अज्ञान आणि गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, जेणेकरून मानव-साप संघर्ष कमी होईल आणि जैवसंतुलन टिकवता येईल.

वनिता बोराडे यांनी सोयरे वनचरे मल्टीपर्पज फाउंडेशनच्या माध्यमातून ही मागणी केली असून, त्यांनी या संदर्भात राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, प्रधान शिक्षण सचिव आणि प्रधान वन सचिव यांना निवेदन पाठवले आहे. त्यांच्या मते, सापांविषयी अज्ञानामुळे केवळ विषारीच नव्हे तर बिनविषारी सापही अनावश्यकपणे मारले जातात, जे पर्यावरणीय असंतुलन निर्माण करण्यास कारणीभूत ठरते.

वनिता बोराडे यांनी नमूद केले की, भारतामध्ये दरवर्षी सुमारे २.५ ते ३.५ लाख लोक सर्पदंशामुळे मृत्युमुखी पडतात, तर महाराष्ट्रात याच परिस्थितीतील मृत्यू दर सुमारे ३० ते ४० हजार इतका आहे. या मृत्यूंचे मुख्य कारण म्हणजे सापांविषयी अज्ञान, भीती आणि चुकीच्या समजुती आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, योग्य माहिती आणि जनजागृतीमुळे सर्पदंशामुळे होणारे मृत्यू टाळता येऊ शकतात. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियात जगातील सर्वाधिक विषारी साप असले तरी सर्पदंशामुळे मृत्यूचे प्रमाण खूपच कमी आहे. हे जनजागृतीचे महत्त्व अधोरेखित करते.

Related News

वनिता बोराडे यांचे मत आहे की, साप आणि इतर वन्यजीव यांचा अभ्यास शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट केल्याने विद्यार्थ्यांना निसर्गाशी संबंधित वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यास मदत होईल. तसेच, मुलांना वन्यजीवांची महत्त्वपूर्ण भूमिका समजेल, त्यांची संवेदनशीलता वाढेल आणि मानव-साप संघर्ष रोखता येईल. वन्यजीवांचे जतन करणे आणि निसर्गाचे संतुलन राखणे या गोष्टींना शिक्षणातूनच सुरुवात होणे आवश्यक आहे.

या मागणीसाठी त्यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लक्ष वेधण्यासाठी आमदार भावना गवळी, आमदार अमित झनक, आमदार धीरज लिंगाडे यांसह इतर आमदारांची भेट घेतली. त्यांनी आमदारांना तारांकित प्रश्न उपस्थित करण्याची विनंती केली, जेणेकरून शालेय अभ्यासक्रमात साप, वन्यजीव, वने आणि पर्यावरण यांचा समावेश होण्यास काळजीपूर्वक आणि तातडीने निर्णय घेता येईल.

वनिता बोराडे यांच्या मते, साप आणि वन्यजीवांविषयी योग्य माहिती नसल्यामुळे, सामान्य लोकांमध्ये भीती, अज्ञान आणि गैरसमज पसरतात. परिणामी बिनविषारी सापांनाही मारले जाते, जे जैवसंतुलन राखण्याच्या दृष्टीने हानिकारक ठरते. त्यांनी सांगितले की, शालेय अभ्यासक्रमात सापांची ओळख, त्यांच्या प्रकार, त्यांच्या भूमिकेचे महत्त्व, तसेच मानव-साप संघर्ष टाळण्याचे मार्ग या विषयांचा समावेश करणे अत्यंत गरजेचे आहे.

वनिता बोराडे यांनी स्पष्ट केले की, साप आणि इतर वन्यजीवांचे शालेय अभ्यासक्रमात समावेश ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना सुरुवातीपासूनच निसर्गाशी निगडीत वैज्ञानिक माहिती मिळाल्यास, ते भविष्यात सांगीतिक दृष्टिकोनातून पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करण्यास अधिक सजग होतील.

read also : https://ajinkyabharat.com/rakesh-kishore-attacked-terrible-incident-and-court-ruckus-in-delhi-court-premises/

Related News