दिल्लीमधील जुन्या राजेंद्र नगरमधील आयएएस कोचिंग सेंटरच्या तळघरात
पावसाचं पाणी शिरून यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या
तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. देशभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.
Related News
'Cocktail 2'चा ट्रेलर पाहून चाहते नाराज; "सैफ अली खानची ती गूफीनेसच मिसिंग" सोशल मीडियावर प्रतिक्रिया
बॉलिवूडमधील लोकप्रिय रोमँटिक-ड्रामा चित्रपटांपैकी एक मानला जाणारा '
Continue reading
IPL 2026 फायनलमध्ये RCB चा ऐतिहासिक विजय; अनुष्का शर्माच्या 25 हजारांच्या साध्या लूकचीही जोरदार चर्चा
इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (
Continue reading
पाऊस आवडतो? पावसावर प्रेम करणाऱ्या लोकांमध्ये असतात काही खास व्यक्तिमत्त्व गुण; मानसशास्त्राचा दावा
पाऊस म्हणजे फक्त हवामान नाही, तर अनेकांसाठी तो एक भा...
Continue reading
जगातील सर्वात गोड आंबा कोणता? गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद असलेल्या ‘कॅराबाओ’ आंब्याची खासियत जाणून घ्या
उन्हाळा सुरू झाला की आंब्यांचा हंगाम रंगात येतो. भारतासह जगभरातील अनेक द...
Continue reading
उन्हाळ्यात मुलांचा आहार कसा असावा? उष्माघात, संसर्ग आणि भूक कमी होण्यापासून संरक्षणासाठी तज्ज्ञांचे मार्गदर्शन
उन्हाळ्याच्या सुट्ट्या स...
Continue reading
इंटरनेटशिवाय रंजक राहण्याची कला Gen Z विसरत आहे का?; नव्या पिढीबद्दलची चर्चा पुन्हा ऐरणीवर
Gen Z इंटरनेटशिवाय कंटाळवाणी होत आहे का? कल्पना करा, वर्ष २०...
Continue reading
मानसशास्त्र सांगते: एखादी व्यक्ती अविस्मरणीय कशी बनते?
मानसशास्त्राचा खुलासा : आपल्या आयुष्यात कधीतरी अशी एखादी व्यक्ती भेटलेली असते, जिची आठवण अनेक वर्षांनंतरही मनातून जात नाही. ...
Continue reading
साखर न घालता बनवा Chikoo Ice Cream; उन्हाळ्यातील हेल्दी आणि स्वादिष्ट डेझर्टची खास रेसिपी
उन्हाळा म्हटला की थंडगार Ice Creamची आठवण हमखास येते. वाढत्या तापमानामुळे अनेकजण शरीराला ...
Continue reading
उन्हाळ्यातील हेल्दी स्नॅक्स: हलके, पोटभर आणि प्रवासातही सोबत नेता येणारे सर्वोत्तम पर्याय
उन्हाळा सुरू होताच आहाराच्या सवयींमध्ये बदल होऊ लागतो. वाढत्...
Continue reading
आमचूर पावडर (Dry Mango Powder) चा रोजच्या स्वयंपाकात असा करा वापर; साध्या पदार्थांनाही मिळेल चटपटीत स्वाद
आमचूर पावडर (Dry Mango Powder) चा अ...
Continue reading
RCB च्या ऐतिहासिक विजयानंतर अनुष्का शर्माचा विराटसाठी खास पोस्ट; प्रेमळ फोटोला 20 लाखांहून अधिक लाईक्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने सलग दुसऱ्यांदा आयपी...
Continue reading
दरम्यान, या मुद्द्यावरून संसदेतही मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं.
देशाच्या राजधानीत घडलेली घटना दुर्दैवी असल्याचं खासदारांनी म्हटलं आहे.
सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या खासदारांनी दिल्लीमधील कोचिंग सेंटर्समध्ये शिकणाऱ्या,
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा
राज्यसभेत उपस्थित केला. दरम्यान, उपराष्ट्रपती तथा राज्यसभेचे सभापती
जगदीप धनखड यांनी कोचिंग सेंटर्सच्या व्यापारीकरणावर जोरदार टीका केली.
ते म्हणाले, कुठलंही वर्तमानपत्र उघडल्यावर त्यामध्ये
अशा कोचिंग सेंटर्सच्या कित्येक जाहिराती दिसतात.
वर्तमानपत्रांमध्ये पानभर जाहिराती दिल्या जातात, पहिल्या, दुसऱ्या,
तिसऱ्या पानावर भल्या मोठ्या जाहिराती दिसतात.
या जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात.
त्यांच्याकडे इतके पैसे येतात कुठून? काही लोकांनी धंदा सुरू केला आहे.
कोचिंग सेंटर्स हा एक प्रकारचा मोठा धंदा झालाय.
मुलं आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी या शहरात येतात आणि त्यांचे पालक
या कोचिंग सेंटर्सवाल्यांना लाखो रुपये देतात. सभापती म्हणाले,
“मी सभागृहातील सर्व सदस्यांकडे आग्रह करतो की प्रत्येकाने यावर उपाय सुचवा.
आपल्या भारताला कुशल तरुणांची आवश्यकता आहे.
मात्र हे कोचिंग सेंटर्सवाले लोक आपल्या तरुणांना एका मर्यादित
साच्यात टाकू पाहतायत. राजधानीतील कोचिंग सेंटर्स एखाद्या गॅस चेंबरपेक्षा कमी नाहीत.
राजेंद्र नगरमध्ये घडलेली घटना वेदना देणारी आहे.
जुन्या राजेंद्र नगर भागात घडलेल्या या दुः खद घटनेवर
आपत्कालीन चर्चा घेण्याच्या मागणीला सभापती धनखड यांनी सहमती दर्शवली.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-gatala-supreme-court-notice/