वरली मटका बंद करण्याची मागणी

कोंडोली येथील मंदिर परिसरातील वरली मटका बंद करण्याची मागणी 

श्री क्षेत्र कोडोली येथील मंदिर परिसरातील खुलेआम वरली मटका,फटका,

अंदर,बाहेर असे अवैध्य धंदे बंद करण्याची मागणी जोर धरत आहे.

मानोरा तालुक्यातील श्रीक्षेत्र कोडोली येथील मंदिरात बऱ्याच दूरदुरून भाविक

Related News

मोठ्या संख्येने दर्शना करिता मोठ्या प्रमाणावर येतात कोंडोली श्री संत गजानन महाराज यांचे शिष्य

श्री पितांबर महाराज यांनी वाळलेल्या अम्र वृक्षाला पालवी फोडली त्या अम्रा वृक्ष च्या दर्शना करिता

मोठ्या संख्येने भाविक येतात तेव्हा मंदिर परिसरातील मोठ्या प्रमाणावर नागरिक बसलेले,

कोणी मोठमोठ्याने आरडा ओरड करताना दिसतात. त्यामुळे भाविक मोठ्या विचारात पडतात.

नंतर त्यांना कळते की त्या ठिकाणी जुगार चालू आहे .त्यामुळे भाविकांमध्ये गावाविषयी नाराजी व्यक्त होते.

गावातील लहान मुलावर मोठा परिणाम पडत आहे. त्यामुळे कोंडोली येथील मंदिर परिसरातील

वरली मटका बंद करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहे.

Related News