अमेरिकेतील ‘नॅशनल फॉरेस्ट सीरियल किलर’ प्रकरण: १७ वर्षांनंतर चौथ्या हत्येची कबुली

अमेरिकेतील 'नॅशनल फॉरेस्ट सीरियल किलर' प्रकरण: १७ वर्षांनंतर चौथ्या हत्येची कबुली

अमेरिकेतील ‘नॅशनल फॉरेस्ट सीरियल किलर’ प्रकरण: १७ वर्षांनंतर चौथ्या हत्येची कबुली

वॉशिंग्टन (अमेरिका):
अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात धोकादायक सिरिअल किलरपैकी एक असलेल्या गॅरी मायकल हिल्टन (Gary Michael Hilton) या 78 वर्षीय व्यक्तीने तब्बल १७ वर्षांनंतर एका हत्येची कबुली दिली आहे. ‘नॅशनल फॉरेस्ट सिरियल किलर’ म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या हिल्टनवर चार जणांच्या निर्घृण हत्येचा आरोप आहे.

चेरिल डनलपच्या हत्येचा उलगडा

गेल्या काही वर्षांपासून हिल्टनने तीन हत्यांची कबुली दिली होती. मात्र, 2025 च्या एप्रिल महिन्यात त्याने चौथ्या हत्येची कबुली दिली.
ही हत्या होती चेरिल डनलप (Cheryl Dunlap) या फ्लोरिडामधील ख्रिश्चन नर्स आणि संडे स्कूल शिक्षिकेची.

हिल्टनची धक्कादायक कबुली

जेव्हा हिल्टनला या हत्येबाबत चौकशी करण्यात आली, तेव्हा त्याने उघडपणे सांगितलं:

“हो, मी तिला मारलं… आणि मला आनंद आहे की मी असं केलं.”

हिल्टनच्या या वक्तव्यानं चौकशी अधिकाऱ्यांना धक्का बसला. सेनेच्या एका जवानाने याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, १७ वर्षांनंतर अखेर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली.

हिल्टनचं क्रूर इतिहास

  • जन्म: 22 नोव्हेंबर 1946

  • अटक: 4 जानेवारी 2008

  • आरोप: चार हत्यांचे

  • मृत्युदंड: एप्रिल 2011 मध्ये फ्लोरिडा कोर्टाकडून दिला

हिल्टनने यापूर्वी तीन हत्यांची कबुली दिली होती – फ्लोरिडा, उत्तर कॅरोलिना आणि जॉर्जिया येथे. मात्र, चौथ्या हत्येबाबत तो दोषी नसल्याचं सांगत होता. आता 2025 मध्ये, त्याने चेरिल डनलपच्या हत्येचीही कबुली दिली.

“मी दुसऱ्यांसारखा नाही…”

एका चौकशीत हिल्टनने तपास अधिकाऱ्याला उद्देशून म्हटलं होतं:

“ठीक आहे, मी दुसऱ्या कोणासारखा नाहीये.”

More news here

https://ajinkyabharat.com/santo-domingo-night-club-accident-circle-kosun-79-cancer-death/

Related News