सँटो डोमिंगो नाईट क्लब दुर्घटना: छत कोसळून 79 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
सँटो डोमिंगो (डॉमिनिकन रिपब्लिक): राजधानी सँटो डोमिंगो येथील प्रसिद्ध जेट सेट नाईट क्लब मध्ये भीषण दुर्घटना घडली आहे.
नाईट क्लबचे छत अचानक कोसळल्याने 79 जणांचा मृत्यू झाला असून 106 जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही दुर्घटना मंगळवारी (८ एप्रिल) रात्री घडली. त्यावेळी क्लबमध्ये लाइव्ह म्युझिक परफॉर्मन्स सुरू होते आणि अंदाजे 500 ते 1000 लोक उपस्थित होते.
Related News
महामार्गावर डाळंबी जवळ कार पलटी एक जखमी
मुर्तिजापूर बसस्थानकावर अनोळखी व्यक्तीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ, ओळख अद्यापही गूढ!
अकोलखेड येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा
अकोल्यातील १३५ वर्षांची ‘कच्छी मशीद’ आता डिजिटल; ‘अजान’ थेट मोबाईलवर ऐकता येणार!
WCL मध्ये नोकरीचं आमिष दाखवून अकोल्यातील २५ बेरोजगारांची अडीच कोटींची फसवणूक; माजी आमदाराच्या नावाने धमकीचा आरोप
ठाकरेंना दुबेंचं थेट आव्हान : “हिम्मत असेल तर बिहारमध्ये या!”
अकोट खरेदी-विक्री संघ ज्वारी खरेदीत झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून गुन्हे दाखल करा
ग्रामीण भागातील पांदन रस्त्याची अवस्था बिकट
शेत रस्त्याचे रूपांतर तलावात : शेतकरी हतबल
पंढरीत विठ्ठल भक्तांचा महापूर
राजकीय चर्चा थांबवा! राज ठाकरेंचा पदाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश
| गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
छत कोसळताच क्लबमध्ये एकच गोंधळ उडाला. बचाव आणि मदतकार्य वेगाने सुरू करण्यात आले असून, अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता आहे.
या दुर्घटनेत वायव्येकडील मॉन्टेक्रिस्टी राज्याचे गव्हर्नर आणि सात वेळा मेजर लीग बेसबॉल ऑल-स्टार राहिलेले नेल्सन क्रूझ यांची बहीण नेल्सी क्रूझ यांचा मृत्यू झाला आहे
त्यांनी राष्ट्राध्यक्ष लुईस अबिनाडर यांना रात्री 12:49 वाजता फोन करून आपली अडकलेली स्थिती सांगितली होती.
त्यानंतर त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाला.
संगीत कार्यक्रमादरम्यान परफॉर्म करत असलेल्या प्रसिद्ध मेरेंग्यू गायक रुबी पेरेझ याला सुरुवातीला वाचवण्यात आल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, मंगळवारी आपत्कालीन सेवा प्रमुख मेंडेझ यांनी सांगितले की पेरेझ अद्याप सापडलेला नाही आणि शोधकार्य सुरू आहे.
पेरेझचा मॅनेजर एनरिक पॉलिनो या दुर्घटनेत गंभीर जखमी झाला असून, त्याच्या शर्टावर रक्ताचे डाग होते.
त्याने सांगितले की कॉन्सर्ट रात्री उशिरा सुरू झाला होता आणि त्याच्या एक तासातच छत कोसळले. या दुर्घटनेत त्यांच्याच गटातील सॅक्सोफोनिस्टचा मृत्यू झाला.
दुर्घटनेचं कारण अद्याप स्पष्ट नाही. जेट सेट नाईट क्लबने एक अधिकृत निवेदन जारी करून म्हटले आहे की,
ते तपास अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहेत. तसेच इमारतीची शेवटची पाहणी कधी झाली, याबाबतही चौकशी सुरू आहे.
For more update
https://ajinkyabharat.com/charangaon-yehethe-shetkyanchi-one-day-shavga-lagwad-work/