न्यूयॉर्क हेलिकॉप्टर दुर्घटना: हडसन नदीत कोसळून सहा जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचा समावेश
न्यूयॉर्क (अमेरिका): न्यूयॉर्कच्या हडसन नदीत हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये स्पेनमधील एकाच कुटुंबातील पाच सदस्य आणि हेलिकॉप्टरचा पायलट यांचा समावेश आहे. मृतांपैकी तीन लहान मुले आहेत.
ही दुर्घटना गुरुवारी दुपारी स्थानिक वेळेनुसार 3:17 वाजता घडली. न्यूयॉर्कचे महापौर एरिक ॲडम्स यांनी या घटनेबद्दल
Related News
पातूर:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील युवा नेतृत्व सातत्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत कार्यरत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
मुंबई येथील राष्ट्रवादी भवन येथे रा...
Continue reading
पातुर (प्रतिनिधी)-अकोला पोलीस दलाच्या वतीने मिशन उडान अंतर्गत पोलीस अधीक्षक अकोला
मा. अर्चित चांडक साहेब यांच्या संकल्पनेतून जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त पोस्टर स्पर्ध...
Continue reading
अकोट
राज्यातील शेतकऱ्यांची पिळवणूक दलालांचे राजकारण बाजार समित्यांतील व्यवस्थेचा बळी ठरणारा सामान्य शेतकरी.
हे चित्र आज नवीन नाही.पण जेव्हा हा भ्रष्टाचार हजारो कोटींचा ठरतो तेव...
Continue reading
अकोला – पोस्टे खदान पोलिसांनी घरफोडीच्या ११ घटनांचा छडा लावत दोन आरोपींना अटक केली
असून एकूण १४ लाख ३२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२४ जून २०२५ रोजी यज्ञ...
Continue reading
बुलढाणा | प्रतिनिधी
बुलढाणा तालुक्यातील कोलवड गावात हृदयद्रावक घटना घडली असून, दोन दिवसांपासून बेपत्ता असलेले ६०
वर्षीय हरिभाऊ जाधव यांचा मृतदेह आज कोलवडजवळील नदीपात्रात आढळून आ...
Continue reading
अंबाजोगाई | प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एक नवजात बाळ मृत घोषित केल्यानंतर दफनविधीवेळी जिवंत
असल्याचे उघड झाल्याची धक्कादायक घटना घडली ...
Continue reading
निरीक्षण अधिकारी पुरवठा बार्शीटाकळी यांचे संकल्पनेतून रास्त भाव धान्य दुकानदार नेहमी कार्डधारकांच्या रोशाला
बळी पडायचे आणि त्यामुळे त्यांना शासन स्तरावून त्रास होत होता. परंतु आ...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्यात अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांना जलाभिषेकासाठी गांधीग्राम
येथील पूर्णा नदीवरून जल नेण्यासाठी हजारो श...
Continue reading
अकोला | प्रतिनिधी
श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी अकोल्याचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर महाराज यांच्या कावड यात्रेसाठी तयारी जोरात सुरू झाली आहे.
यावर्षी श्रावण महिना २८ जुलै...
Continue reading
तेल्हारा दि :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार
यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अकोला जिल्हा महासचिव पदी ...
Continue reading
गुरुपौर्णिमा हा एक केवळ उत्सव नसून, आपल्या जीवनातील गुरूंच्या स्थानाचे
स्मरण करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा पवित्र दिवस आहे.
हा दिवस आपल्याला विनम्रता, कृतज्ञता आणि ...
Continue reading
इंझोरी | प्रतिनिधी
इंझोरी महसूल मंडळातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकटाचे ढग गडद झाले आहेत. अति पावसानंतर आता
रिमझिम पावसामुळे २०० एकरांवर दुबार पेरणी खोळंबली असून शेतकरी अक्षरशः...
Continue reading
माहिती देताना मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला. “मृतांचे नातलग आणि मित्र परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत,” असे त्यांनी सांगितले.
दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर ‘न्यूयॉर्क हेलिकॉप्टर्स’ या कंपनीचे होते आणि ते पर्यटकांना न्यूयॉर्क सिटीचे विहंगम दृश्य
दाखवण्यासाठी वापरले जात होते. मृतांमध्ये सीमेन्स मोबिलिटी कंपनीचे सीईओ ऑगस्टिन, त्यांची पत्नी, आणि तीन मुले आहेत. हा संपूर्ण कुटुंब न्यूयॉर्क भेटीसाठी आलेला होता.
बचावकार्य तत्काळ सुरू
न्यूयॉर्कचे अग्निशमन आयुक्त रॉबर्ट टकर यांनी सांगितले की दुर्घटनेची पहिली सूचना मिळताच बचाव नौका आणि पथक तात्काळ
घटनास्थळी रवाना झाले. चौघांना घटनास्थळीच मृत घोषित करण्यात आले. उर्वरित दोघांना रुग्णालयात नेण्यात आले, परंतु उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दुर्घटना मॅनहॅटनच्या पश्चिम बाजूला, हडसन नदीकिनाऱ्यावरील फॅशनेबल दुकाने, हॉटेल्स आणि न्यूयॉर्क विद्यापीठाच्या मुख्य कॅम्पसजवळ घडली.
न्यूयॉर्क शहरात याआधीही अशा हेलिकॉप्टर दुर्घटना घडल्या आहेत:
-
2018: ईस्ट रिव्हरमध्ये एक हेलिकॉप्टर कोसळले होते. त्यात पाच प्रवाशांचा मृत्यू, फक्त पायलट वाचला.
-
2009: हडसन नदीवर इटालियन पर्यटकांना घेऊन जाणारे हेलिकॉप्टर एका खाजगी विमानाला धडकले होते. यात नऊ जणांचा मृत्यू झाला होता.
चौकशी सुरू
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी FAA (Federal Aviation Administration) आणि NTSB (National Transportation Safety Board)
यांनी तपास सुरू केला आहे. हेलिकॉप्टर का कोसळले, याचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही
More update here
https://ajinkyabharat.com/santo-domingo-night-club-accident-circle-kosun-79-cancer-death/