महाराष्ट्र विधानसभेसाठी मतदान करण्यासाठी नाव नोंदणी, दुरूस्ती साठी आज शेवटची संधी

महाराष्ट्रात

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबर दिवशी एकाच टप्प्यात विधानसभा

निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. या निवडणूकीमध्ये

मतदान करण्यासाठी नागरिकांचे नाव मतदार यादीमध्ये

Related News

असणं आवश्यक आहे. त्यामुळे आता नागरिकांना ऑनलाईन

माध्यमातून त्यांचं नाव मतदार यादीमध्ये आहे की नाही? हे

तपासण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तर यामध्ये काही

बदल करायचं असल्यास किंवा नवी नाव नोंदणी करण्यासाठी

ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

voters.eci.gov.in या निवडणूक आयोगच्या अधिकृत वेबसाईट

वर मतदारांना नाव नोंदणी, दुरूस्ती आणि अपडेटची सोय आहे.

मतदारांना नवी नाव नोंदणी करण्यासाठी फॉर्म 6 भरावा लागणार

आहे. तर नावामध्ये बदल, पत्ता बदलला असेल, फोटो, मोबाईल

नंबर अपडेट करायचा असेल तर फॉर्म 8 भरावा लागणार आहे.

मतदार यादी मधून नाव वगळण्यासाठी फॉर्म 7 भरावा लागणार

आहे. तसेच ऑनलाईन ई इपिक कार्ड डाऊनलोड करायचे असेल

तर मोबाईल नंबर आणि फोटो अपडेट करणं आवश्यक आहे.

voters.eci.gov.in च्या होम पेज वर हे फॉर्म उपलब्ध आहेत.

Read also: https://ajinkyabharat.com/police-constable-who-accompanied-baba-siddiqui-during-his-murder-suspended/

Related News