मुर्तिजापूर नगर परिषद निवडणूक २०२५ अंतर्गत दिनांक ०२ डिसेंबर रोजी झालेल्या मतदानानंतर ईव्हीएम सुरक्षित साठवणुकीसाठी स्ट्राँग रूममध्ये कडक सुरक्षा व्यवस्था राबविण्यात आली आहे. मा. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाच्या आदेशानुसार दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी होणारी मतमोजणी नंतर २१ डिसेंबर २०२५ रोजी घेऊन निकाल जाहीर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना मिळाले आहेत.
निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार, स्ट्राँग रूमच्या साठवणुकीची पूर्ण जबाबदारी निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार यांनी स्वीकारली असून, मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्यासाठी गोडाऊनमध्ये आवश्यक सर्व सुरक्षा उपकरणे व बॅरेकेटिंग करण्यात आले आहे. २४ तास सशस्त्र सुरक्षा तैनात करण्यात आली असून, उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अजित जाधव यांनी १४ डिव्हिजनल व ६ मुख्यालयाचे एकूण २० पोलिस कर्मचारी सतर्कतेने पहारा देण्यासाठी नियुक्त केले आहेत. यात एसआरपीएफची तुकडीदेखील समाविष्ट आहे. संपूर्ण त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्थापनाची जबाबदारी पी. एस.आय. गणेश सूर्यवंशी व चंदन साहेब यांच्याकडे आहे.
सुरक्षा व्यवस्थापनाची पाहणी निवडणूक निर्णय अधिकारी संदीपकुमार अपार, पोलिस निरीक्षक अजित जाधव व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी निलेश जाधव यांनी केली. राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी गोडाऊनमध्ये प्रवेश करून सुरक्षा व्यवस्था पाहू शकतात. उमेदवार किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींना मतदान यंत्र साठवणूक गोडाऊनच्या बाहेरून पाहता येईल अशा ठिकाणी बसण्याची सोय करण्यात आली आहे.
Related News
या कठोर सुरक्षा उपाययोजनांमुळे स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यास व मतमोजणीपूर्वी कोणत्याही प्रकारच्या गैरप्रकार टाळण्यास सक्षम वातावरण तयार करण्यात आले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे पालन करत प्रशासनाने पूर्ण पारदर्शक व सुरक्षित प्रक्रिया सुनिश्चित केली आहे.
read also : https://ajinkyabharat.com/akot-daryapur-roadwar-truck-overturns-carrying-500-carats-loss/
