महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग असोसिएशन व बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील सर्वात भव्य व प्रतिष्ठेची राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा — ‘राजमाता जिजाऊ बॉक्सिंग चॅम्पियनशिप २०२५’ — शेगाव येथे ९ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. वरिष्ठ पुरुष, युवक आणि महिला गटातील राज्यभरातील नामवंत तसेच उदयोन्मुख बॉक्सर या स्पर्धेत सहभागी होणार असून जवळपास ८०० हून अधिक खेळाडू विविध वजनगटांमध्ये आपले कौशल्य पणाला लावणार आहेत.
मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धा होणार असल्याने संपूर्ण जिल्ह्यात क्रीडामय वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष मा. विठ्ठलराव लोखंडकर यांच्या विशेष प्रयत्नांतून आणि बुलढाणा जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनच्या नियोजनातून हा मान जिल्ह्याला मिळाल्याची माहिती आयोजकांनी दिली. ग्रामीण भागातील खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच बॉक्सिंगसारख्या खेळाला चालना मिळावी, हा या आयोजनामागील मुख्य उद्देश आहे.
स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राज्याचे क्रीडामंत्री, केंद्र व राज्यातील मान्यवर मंत्री, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, आमदार, खासदार, क्रीडा अधिकारी तसेच देशातील नामांकित बॉक्सिंग प्रशिक्षक, पंच व खेळतज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. दररोज सकाळी व दुपारी प्राथमिक फेऱ्या तर सायंकाळी उपांत्य व अंतिम सामने रंगणार असून प्रेक्षकांसाठी मोफत प्रवेश ठेवण्यात आला आहे.
Related News
PAK vs ENG: मैदानात मोठा राडा! हॅरिस रौफ-विल जॅक्समध्ये वाद, VIDEO व्हायरल; पाकिस्तानचा थरारक विजय
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ आणि इंग्लंडचा खेळाडू विल जॅक्स यांच्यात मैद...
Continue reading
IND vs NZ 2nd T20: 70/5 वरून भारताचा थरारक विजय! तिलक, नमन आणि नितीशने फिरवला सामना
क्राइस्टचर्च, २४ ऑक्टोबर २०२६ : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या टी२०...
Continue reading
मोठी घोषणा! निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेची दमदार एंट्री; युरोपियन टी20 लीगमध्ये 'मार्की' खेळाडू म्हणून निवड
मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाण...
Continue reading
IND vs ENG 3rd ODI मध्ये भारताच्या Playing XI मध्ये तीन मोठे बदल करण्यात आले आहेत. जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर असून केएल राहुल, अर्शदीप सिंग आणि प्रिन्स यादव यांना संधी मिळाली...
Continue reading
भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या वनडे सामन्यात भारताच्या प्लेइंग 11 मध्ये 1 मोठा बदल झाला आहे. केएल राहुल आजारी असल्याने बाहेर पडला असून त्याच्या जागी ईशान किशनला संधी देण्यात आ...
Continue reading
विराट कोहली News : सलग 2 शून्यांनंतर विराटचा जबरदस्त कमबॅक, अभिषेक नायरांनी सांगितला खास किस्सासलग दोन सामन्यांत शून्यावर बाद झाल्यानंतर विराट कोहलीने कोचचा सल्ला नाकारत स्वतःव...
Continue reading
IND vs ENG 1st ODI : 125 धावांचे वादळी शतक झळकवूनही ईशान किशन Playing 11 मधून बाहेर; जाणून घ्या 5 मोठी कारणे
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आज उत्साहात...
Continue reading
FIFA World Cup 2026 Semi Final 1 : स्पेन की फ्रान्स? 7 दमदार कारणांमुळे रंगणार महासंग्राम, एम्बापे-यमालवर जगाच्या नजरा
डलास (अमेरिका) : फिफा वर्ल्ड कप 2026 च्या पहिल्या उपांत्य फे...
Continue reading
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेपूर्वी टीम इंडिया बर्मिंगहॅममध्ये फिरताना दिसली. रोहित शर्माला पाहताच चाहत्यांनी सेल्फीसाठी मोठी गर्दी केली. श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव यां...
Continue reading
IND vs ENG 1st ODI मध्ये रोहित शर्मासमोर तीन मोठे ऐतिहासिक विक्रम रचण्याची संधी आहे. इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक शतके, भारताचा नंबर-1 सलामीवीर आणि 39 व्या वर्षी नवा इतिहास घडवण्याची शक...
Continue reading
IND W vs ENG W Test : 22 वर्षीय क्रांती गौडने लॉर्ड्स कसोटीत 5 विकेट्स घेत इतिहास रचला. आईने क्रिकेटसाठी दागिने विकल्यापासून भारताची मॅचविनर बनण्यापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास जाणून...
Continue reading
भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 14 जुलैपासून सुरुवात होत आहे. टी-20 मालिकेतील 0-4 पराभवानंतर टीम इंडियासाठी ही मालिका प्रतिष्ठेची ठरणार आहे. रोहित शर्मा, व...
Continue reading
स्पर्धेचे संपूर्ण कव्हरेज करण्यासाठी राज्यातील प्रमुख इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मीडिया प्रतिनिधी शेगावात दाखल होणार आहेत. त्याचबरोबर हजारो खेळाडू, प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींची उपस्थिती अपेक्षित असल्याने शेगाव शहरात मोठी वर्दळ व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक प्रशासनाकडून वाहतूक, सुरक्षा, निवास, वैद्यकीय सुविधा तसेच भोजन व्यवस्थेसाठी विशेष तयारी करण्यात आली आहे.
ही स्पर्धा केवळ खेळाची मैफल न राहता बुलढाणा जिल्ह्याच्या क्रीडा विकासाला चालना देणारा ऐतिहासिक क्षण ठरणार असल्याचे मत क्रीडाप्रेमींमध्ये व्यक्त होत आहे. शेगावच्या भूमीत होणाऱ्या या राज्यस्तरीय महास्पर्धेमुळे लहान शहरातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे बॉक्सर घडवण्याची प्रेरणा निश्चितच मिळणार आहे.
read also : https://ajinkyabharat.com/tight-security-arrangements-in-murtijapur-strong-room/