लोणार (जांभोरा प्रतिनिधी) : बुलडाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील चिखला काकड गावात गंभीर तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख संजीवनी वाघ यांच्यावर गावातील काही जणांनी बेदम मारहाण केल्याचा आरोप समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
संजीवनी वाघ यांनी आरोप केला आहे की, गावचे सरपंच आणि त्यांच्या समर्थकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या मारहाणी दरम्यान त्यांच्या अंगावरील कपडेही फाडण्यात आले. यासंदर्भातील काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यामध्ये ही घटना उघडपणे घडताना दिसत असल्याचा दावा केला जात आहे.
या प्रकरणामागे गावात काही दिवसांपूर्वी बसवण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचा वाद असल्याचे समोर आले आहे. अज्ञात व्यक्तींनी हा पुतळा उभारला होता. मात्र, तो हटवण्याचा प्रयत्न सरपंचांकडून होत असल्याचा आरोप आहे. याला संजीवनी वाघ यांनी विरोध केल्यामुळेच हा हल्ला झाल्याचे त्यांनी सांगितले.
Related News
मनोज जरांगेंनंतर रामदास कदमांचाही पलटवार! ‘तुमच्या गुप्त बैठकीची क्लिप माझ्याकडे’
उद्धव ठाकरे राजकारणातील ‘टाइमपास’! प्रवीण दरेकरांचा घणाघात
500 कोटींच्या आरोपाने खळबळ! एकनाथ शिंदेंना ईडीचे समन्स पाठवा; संजय राऊतांची मागणी
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा; ‘कितीही त्रास दिला तरी शरण येणार नाही’
Manoj Jarange Patilची रुग्णालयातून मोठी घोषणा; ‘आता पाटोद्यापासून पुढे मुंबईत आंदोलन’
अखेर राज्यात दुष्काळ जाहीर! 265 तालुक्यांना दुष्काळाची झळ; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
Manoj Jarange Patilना डिफेंडर देणारा भोसले कोण? २ लाखांचा मोबाईल, ७५० कोटींच्या कंत्राटांवर बारस्करांचे सवाल
Tukaram Mundhe च्या पत्राने खळबळ! 11 रुपयांचा IV सेट रुग्णांना 325 रुपयांना
40 विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस सुपे घाटात उलटली; 4 ते 5 विद्यार्थी जखमी
शेतकरी संकटात, जरांगे उपोषणावर; राऊतांचा सरकारला सवाल – ‘महाराष्ट्राकडे पाहायला वेळ आहे का?’
DJ विरोधी भूमिका विद्यानंद बापटांना पडली महागात; हिंदू सेवा संघाची थेट हद्दपारीची मागणी!
“तुम्ही आडवे या, मराठ्यांना एक जरी काठी लागली तर…” Manoj Jarange Patil चा सरकारला थेट इशारा!
“मी पुतळा हटवण्यास विरोध केला, त्यामुळे मला लक्ष्य करण्यात आले. पोलिसांसमोरच माझ्यावर हल्ला झाला आणि माझे कपडे फाडण्यात आले,” असे संजीवनी वाघ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, या घटनेनंतर संजीवनी वाघ यांनी आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर धक्कादायक इशारा दिला आहे. “सगळं संपलं आहे. उद्या सकाळी ७ वाजता मी आत्महत्या करणार आहे,” असे त्यांनी स्टेटसमध्ये लिहिले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासन सतर्क झाले असून गावात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
