दानापूर: मुख्यमंत्री समूह पंचायत राज अधिनियमांतर्गत दानापूर ग्रामपंचायतीत २१ नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. या बैठकीत नागरिकांसाठी दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. ग्रामसभेत घरकर, पाणीपट्टी, दिवापट्टी तसेच इतर सर्व करांच्या थकबाकीवर ५० टक्के सवलत देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला.
निर्णयानुसार, चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये लागणारे सर्व कर एकरकमी भरणे आवश्यक आहे. त्याचबरोबर, १ एप्रिल २०२५ पूर्वीची सर्व थकबाकी एकरकमी भरल्यास करदात्यांना ५० टक्के सवलत मिळेल. उर्वरित रक्कम करदात्याने भरणे अनिवार्य आहे. ही सवलत योजना ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतच लागू राहणार आहे आणि या कालावधीत भरलेल्या रकमेवरच सूट मान्य केली जाईल.
विशेष ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच सपना धम्मपाल वाकोडे यांनी बैठक अध्यक्षस्थानी भूषविली, तर ग्रामविकास अधिकारी संजय उईके यांनी प्रशासकीय मार्गदर्शन केले. यावेळी उपसरपंच सागर रामकृष्ण ढगे, ग्रामपंचायत लिपिक अशोक आनंदा राहणे, ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आणि चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
Related News
Cabinet Decisions : ग्रामपंचायतीपासून अनुसूचित जातीपर्यंत… महाराष्ट्र सरकारचे 7 मोठे निर्णय; कॅबिनेट बैठकीत नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्र...
Continue reading
Farmer Loan Waiver : शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच जाहीर होणार; ‘या’ वेळी मिळणार मोठी अपडेट
राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे...
Continue reading
PM मोदींची 9.12 लाखांची गुंतवणूक! पोस्ट ऑफिस NSC योजनेत 5 वर्षांत मिळवा दमदार परतावा, जाणून घ्या 7 मोठे फायदे
आजच्या काळात सुरक्षित आणि हमखास परतावा देणाऱ्या गुंतवणूक योजनांचा शोध...
Continue reading
चर्चेत आलेला विवाह ! वरमाळेनंतर नवरीचा मोठा निर्णय,
आनंदाच्या वातावरणात सुरू झालेला विवाह सोहळा काही मिनिटांतच वादाच्या भोवऱ्यात अडकला आणि अखेर लग्न मोड...
Continue reading
अकोला : 24 जूनच्या भीषण वादळात बाहेकर कुटुंबाचे छप्पर उडाले; 3 पत्रे उडून संसार उद्ध्वस्त
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील दातवी गावात 24...
Continue reading
ITR Filing 2026 करताना Section 80D अंतर्गत आरोग्य विमा प्रीमियमवर 25 हजार ते 1 लाख रुपयांपर्यंत कर कपात कशी मिळते? जुनी आणि नवीन करप्रणालीतील फ...
Continue reading
परदेशात राहणाऱ्या भारतीयांसाठी महत्त्वाची माहिती NRI : DTAA नियमामुळे दुहेरी कराचा बोजा टाळता येणार
परदेशात वास्तव्यास असलेल्या अनिवासी भारतीयांसाठी (NRI)...
Continue reading
PPF योजना – सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणूक
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना ही भारत सरकारद्वारे राबवली जाते आणि तिच्यावर पूर्ण सरकारी हमी आहे. या योजनेत गुंतवणूक करणे म्हणजे सुर...
Continue reading
SJVN Limited शेअरमध्ये तुफान: गुंतवणूकदारांसाठी डिव्हिडंडसह परतावा
नवरत्न कंपनी एसजेव्हीएन लिमिटेडच्या (SJVN Li...
Continue reading
तेल्हारा – मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तेल्हारा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गाडेगाव ग्रामपंचायतीत...
Continue reading
अत्यावश्यक औषधे, ईव्ही बॅटरी, स्मार्टफोन आणि सोलर पॅनेल स्वस्त होणार आहेत; तर लक्झरी घड्याळे, खतं आणि ‘सिन गुड्स’ (तंबाखूजन्य उत्पादने इ.) महागण्याची शक...
Continue reading
जोगापुरात तीव्र पाणीटंचाई; ग्रामस्थांचे आमरण उपोषण
चंद्रपूर प्रतिनिधी : गोंडपिपरी तालुक्यातील करंजी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जोगापुर गावात गेल्या ...
Continue reading
ग्रामपंचायतीकडून नागरिकांना विनंती करण्यात आली आहे की निश्चित मुदतीत कर भरण्याची दक्षता घ्यावी, जेणेकरून ५० टक्के सवलतीचा लाभ मिळू शकेल. ही योजना नागरिकांच्या आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि स्थानिक विकासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरली आहे.
READ ALSO : https://ajinkyabharat.com/a-major-disaster-was-averted-due-to-the-widespread-fire-and-the-tireless-efforts-of-the-villagers-caused-the-fire-to-self-destruct/