[stock-market-ticker symbols="AAPL;MSFT;GOOG;HPQ;^SPX;^DJI;LSE:BAG" stockExchange="NYSENasdaq" width="100%" palette="financial-light"]
Nagpur Violance : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. ईरफान अंसारी असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. गेल्या काही दिवसापासून नागपुरातील मेयो रुग्णालयात (Mayo Hospital) ईरफान अन्सारी यांच्यावर उपचार सुरु होते. सोमवारी झालेल्या हिंसाचारात ते गंभीर जखमी झाले होते. अखेर उपचार दरम्यान मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडले आहे. किंबहुना या घटनेने नागपूर हिंसाचाराचा (Nagpur Violance) पहिला बळी आज अन्सारी ठरल्याचे पुढे आले आहे. नागपुरात गेल्या सोमवारी(17 मार्च) विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या आंदोलनानंतर मोठा हिंसाचार भडकला. दोन गटात झालेल्या राड्यानंतर शहरात प्रचंड तोडफोड आणि जाळपोळ झाल्याचे बघायला मिळाले. यात दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत पोलिसांसह नागरिकही जखमी झाले. दंगलीनंतर या घटनेचे पडसाद सर्वत्र उमटत असतांना या हिंसाचाराची दाहकता ही समोर आली आहे.

नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी, मेयो रुग्णालयात इरफान अन्सारीने प्राण सोडला

Nagpur : नागपुरातील हिंसाचाराच्या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. दंगेखोरांकडून केलेल्या दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेत जखमी अवस्थेतच असेलल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माह...

Continue reading

मोबाइल स्टेटसवरून पोलिसांची अमानुष मारहाण; युवक आक्रमक

मोबाइल स्टेटसवरून पोलिसांची अमानुष मारहाण; युवक आक्रमक

उरळ | मोबाइल फोनवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून उरळ पोलिसांनी काही युवकांना अमानुषपणे मारहाण केल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि दोषी पोलिसांवर कारवाईच्या माग...

Continue reading

पुणे: पुणे शहरातील चंदननगर परिसरामध्ये पत्नीवरील चारित्र्याच्या संशयातून आयटी अभियंत्याने आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा जीव घेतल्याची माहिती समोर आली आहे. पत्नीशी भांडण आणि तिच्यावर असलेल्या संशयातून पतीने चाकूने गळा चिरून मुलाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना समोर आली आहे. हिम्मत माधव टिकेटी असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे. काल (शुक्रवारी दि. 21) दुपारी नगररोड दर्गाच्या बाजूला पराशर सोसायटी विमानतळ परिसरातील निर्जनस्थळी मुलाचा मृतदेह आढळून आला होता, ही धक्कादायक घटना पुण्यातील चंदननगर परिसरात घडली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आयटी अभियंता असलेला माधव साधुराव टिकेटी (38, रा. रतन प्रेस्टीज बिल्डिंग, तुकारामनगर, चंदननगर) असे खून करणाऱ्या नराधम बापाचं नाव असून, त्याला चंदनगर पोलिसांनी अटक केली आहे. तो मूळचा विशाखापट्टनम येथील राहणारा असून, 2016 पासून तो पुण्यात वास्तव्यास आहे. याबाबत स्वरूपा माधव टिकेटी (वय ३०) यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आहे. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घ्यायचा अन्... चंदननगर परिसरातमध्ये हे कुटुंब वास्तव्यास आहे. आरोपी माधव आणि त्याची पत्नी स्वरूपा हे उच्चशिक्षित आहेत. त्यांना आठ वर्षांची मुलगी आहे आणि साडेतीन वर्षाचा मुलगा होता. माधव हा आयटी कंपनीत कामाला आहे. पण काही महिन्यांपूर्वी त्याला कामावरून काढून टाकले होतं. तसेच तो सतत दारूच्या नशेत असतो. माधव पत्नीवर नेहमी चारित्र्याचा संशय घेत होता. गुरुवारी सकाळी त्याचे पत्नीशी भांडण झाले. भांडणाच्या आवाजामुळे हिंमत झोपेतून उठला. दुपारी साडेबारा वाजता माधव घरातून बाहेर पडत असताना त्याने मुलीला घेऊन येतो म्हणून घरातून निघाला सोबत मुलाला घेऊन निघाला. त्यामुळे आरोपीने मुलाला दुचाकीवर बसवून सोबत नेले. खराडी परिसरात फिरल्यावर त्याने दारू प्यायली आणि एका दुकानातुन धारदार चाकू खरेदी केला. त्यानंतर खराडी दर्ग्यासमोरील फॉरेस्ट पार्क परिसरात निर्जनस्थळी जाऊन चाकूने मुलाचा गळा चिरून खून केला. त्याने मुलाला तिथेच टाकलं आणि तो सायंकाळी वडगाव शेरीतील एका लॉजमध्ये जाऊन झोपला. रात्रीचे नऊ वाजले त्यानंतर पती आणि मुलगा घरी न आल्याने आईने चंदननगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी परिसरातील ‘सीसीटीव्ही’ आणि तांत्रिक विश्लेषणावरून आरोपीचा शोध घेतला. त्याने भरपूर दारू प्यायली होती. मुलाचा ठावठिकाणा सांगता येत नव्हता. शुक्रवारी पुन्हा आरोपीकडे कसून तपास केल्यावर मुलाचा खून केल्याची कबुली दिल्याची माहिती दिली . असा झाला खुनाचा उलगडा माधवसोबत मुलगा हिम्मत पोलिसांना सापडला नाही. त्यांनी त्याच्याकडे चौकशी केली. मात्र, त्याने आपण दारू पिल्यानंतर सिगारेट ओढत असताना हडपसर येथील बस स्टँडवर तो हरवला असं सांगितलं. पोलिसांना माधवच्या बोलण्यावर संशय होता. दरम्यान, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सीमा ढाकणे, स्वाती खेडकर, सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत माने, उपनिरीक्षक अजय असवले, राहुल कोळपे, पोलिस हवालदार विश्वनाथ गोणे यांच्या पथकाने माधवला ताब्यात घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवला आणि चौकशी केली, त्यानंतर त्याच्याकडून या धक्कादायक प्रकाराची माहिती मिळाली. मुलाचा खून करून त्याचा मृतदेह फेकून दिल्याचे सांगितले. दुकानातून चाकू, ब्लेड विकत घेतलं तपासादरम्यान पोलिसांना नराधम माधवचं सीसीटीव्ही फुटेज हाती लागलं. त्यामध्ये माधव मुलगा हिम्मत याला घेऊन जाताना दिसत आहे. तसेच, एका दुकानातून त्याने ब्लेड आणि चाकू खरेदी केला. त्यानंतर त्याने गुरुवारी दुपारी अडीच ते पावने तीनच्या सुमारास मुलगा हिम्मतचा चाकूने गळा कापून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह तिथेच फेकून दिल्यानंतर लॉजवर येऊन झोपला होता.

‘हा मुलगा माझा नाही’, पतीच्या डोक्यावर संशयाचं भूत, तीन वर्षांच्या मुलाला घेऊन गेला त्याला संपवलं अन्…दारू पिऊन लॉजवर गेला

Father kills son: फिर्यादी स्वरूपा ह्या चंदननगर येथे त्याचे पती माधव, आठ वर्षाची मुलगी व तीन वर्षाच्या मुलासोबत राहण्यास आहेत. त्या गृहिणी असून, पती माधव हा आयटी कंपनीत अभियंता आह...

Continue reading

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही...; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime : आम्ही देशमुख, तुम्ही पाटील, तुमची औकात नाही…; नांदेडमध्ये प्रेमप्रकरणातून तरुणाला मारहाण, उचललं टोकाचं पाऊल

Nanded Crime : आमच्या मुलीशी का बोलतोस, असे म्हणत नातेवाईकांनी तरुणाला बेदम मारहाण केली होती. यानंतर तरुणाने टोकाचे पाऊल उचलल्याने नांदेडमध्ये खळबळ उडाली आहे. Nanded Crime : आमच्...

Continue reading

मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?

मनसेच्या पाडवा मेळाव्याचा मार्ग मोकळा, शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार, नेमकं काय बोलणार?

यंदाच्या मेळाव्याला विशेष राजकीय महत्त्व असून महापालिका निवडणुकीपासून ते सध्या महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे भूमिका स्पष्ट करतील अशी शक्यता व...

Continue reading

घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

घरात रोख रकमेचा साठा, न्यायाधीशांच्या घरी आग लागल्यानंतर उघड झालं रहस्य; सुप्रीम कोर्टाने केली बदली

सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कॉलेजियमने दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश जस्टिस यशवंत वर्मा (Justice Yashwant Varma ) यांची बदली अलाहाबाद हायकोर्टात (Allahabad High Court) करण्य...

Continue reading

रमजानमध्ये तिरूपती मंदिरात गेल्यानं शाहीर शेख ट्रोलर्सच्या निशाण्यावर

रमजानमध्ये तिरूपती मंदिरात गेल्यानं शाहीर शेख ट्रोलर्सच्या निशाण्यावर

Shaheer Sheikh Seeks Blessing at Tirupati Temple During Ramadan Month : रमजानच्या महिन्यात शाहिर शेखनं तिरूपती बालाजीच्या मंदिरात जाऊन घेतलं देवाचं दर्शन haheer Sheikh Seeks Bles...

Continue reading

काय म्हणाल्या केंद्रीय मंत्री? हा निर्णय चुकीचा असल्याचं केंद्रीय मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी म्हटलंय. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणात लक्ष घालण्याची विनंतीही केली आहे. अशा निर्णयामुळे समाजात चुकीचा संदेश जाईल, असे त्यांनी यावेळी म्हटले. अलाहबाद उच्च न्यायायलाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांनी दोन व्यक्तींच्या बाजूने निकाल दिला. बलात्काराच्या आरोपाखाली त्यांना समन्स बजावण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. आप खासदारही संतापल्या माजी डीसीडब्ल्यू प्रमुख आणि आप खासदार स्वाती मालीवाल यांनीही न्यायालयाच्या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. हे खूप दुर्दैवी आहे. निकालपत्रात केलेल्या टिपण्णीने मला खूप धक्का बसला आहे. ही खूप लज्जास्पद असल्याचे स्वाती मालीवाल म्हणाल्या. त्या पुरूषांनी केलेले कृत्य बलात्काराच्या श्रेणीत का येत नाही? या निर्णयामागील तर्क मला समजत नाही. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असे आवाहनही आप खासदार स्वाती मालीवाल यांनी केले. ' आरोपींवर POCSO कायद्याचे कलम 18 लावलेच नाही' आरोपी पवन आणि आकाशवर कासगंज ट्रायल कोर्टाच्या निर्देशानुसार सुरुवातीला बलात्काराच्या आरोपाखाली भारतीय दंड संहितेच्या कलम 376 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 18 अंतर्गत खटला चालवला जाणार होता. असे असताना अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती राम मनोहर नारायण मिश्रा यांच्या खंडपीठाने आरोपीवर कलम 354-ब आयपीसी (वस्त्र उतरवण्याच्या उद्देशाने हल्ला किंवा गुन्हेगारी बळाचा वापर) तसेच पॉक्सो कायद्याच्या कलम 9/10 (तीव्र लैंगिक अत्याचार) अंतर्गत खटला चालवण्याचे निर्देश दिले. खंडपीठाने निर्णय देताना काय म्हटलं? आरोपी पवन आणि आकाश यांच्यावर लावण्यात आलेले आरोप आणि प्रकरणातील तथ्ये या प्रकरणात बलात्काराच्या प्रयत्नाचा गुन्हा ठरवत नाहीत, असे खंडपीठाने म्हटले. बलात्काराच्या प्रयत्नाचा आरोप लावण्यासाठी अभियोजन पक्षाने हे सिद्ध केले पाहिजे की, ते तयारीच्या टप्प्याच्या पलीकडे गेले आहे. तयारी आणि गुन्हा करण्याचा प्रत्यक्ष प्रयत्न यातील फरक प्रामुख्याने जास्त प्रमाणात दृढनिश्चयात असतो, असे खंडपीठाने म्हटले.

‘लाजिरवाणा आणि चुकीचा निर्णय…’ उच्च न्यायालयाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्र्यांनी उपस्थित केले प्रश्न!

Allahabad High Court Decesion: अलाहबाद हायकोर्टच्या निर्णयावर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी टीका करत निषेध नोंदवला. Allahabad High Court Decesion: अलाहब...

Continue reading

दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे

दररोज केळी खाल्ल्यास शरीरावर होणारे फायदे

केळं हे वर्षभर उपलब्ध असलेलं आणि सहज परवडणारं फळ आहे. बहुतांश घरांमध्ये केळी आढळतात, आणि काही लोक तर रोजच त्याचं सेवन करतात. पण दररोज केळी खाल्ल्याने शरीरावर कोणते परिणाम होतात? ...

Continue reading

पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर हल्ल्याचा तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

पत्रकार विठ्ठलराव महल्ले यांच्यावर हल्ल्याचा तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी

पातुर | प्रतिनिधी अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध क्राईम रिपोर्टर विठ्ठलराव महल्ले यांच्यावर बुधवारी रात्री भ्याड हल्ला करण्यात आला. रात्री ११ वाजताच्या सुमारास ते आपले काम आटोपून घरी...

Continue reading