नवी दिल्ली : ‘फौजदारी खटल्यांच्या सुनावणीदरम्यान उलटलेल्या साक्षीदारांची प्रभावी आणि अर्थपूर्ण उलटतपासणी सरकारी वकिलांकडून बिलकुल होताना दिसत नाही,’ असे खडे बोल सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच सुनावले. ‘न्यायालयांनी केवळ टेपरेकॉर्डरसारखे काम करू नये, सुनावणीमध्ये सहभागाची भूमिका घेणे गरजेचे आहे,’ या शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
‘सत्य प्रस्थापित करणे आणि न्यायाचे उद्दिष्ट साध्य करणे हे न्यायालयांचे कर्तव्य आहे. त्यासाठी न्यायाधीशांनी कार्यवाहीवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. सरकारी वकील कामात उदासीन किंवा आळशी असेल, तरीही सत्य समोर यावे यासाठी न्यायालयाने कामकाजावर प्रभावी नियंत्रण ठेवले पाहिजे,’ असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले.
पत्नीच्या हत्येप्रकरणी १९९५मध्ये जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका व्यक्तीच्या शिक्षेवर न्यायालयाने शुक्रवारी शिक्कामोर्तब केले. त्या वेळी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही निरीक्षणे नोंदवली. या पीठामध्ये न्या. जे. बी. पारडीवाला आणि न्या. मनोज मिश्रा यांचाही समावेश होता.
Related News
राज्य निवडणूक आयोगाची महत्त्वाची तयारी; जिल्हा परिषद निवडणुका दोन टप्प्यात घेण्याचा विचार
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भात राज्य निवडणूक आ...
Continue reading
SC on Local Body Election: निवडणुका, आरक्षण आणि राज्य निवडणूक आयोगाची भूमिका
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षणाची मर्यादा आणि निवडणूक...
Continue reading
CJI भूषण गवई: बौद्ध धर्माचा अनुयायी, पण धर्मनिरपेक्षता आणि न्यायावर ठाम श्रद्धा
भारताचे सरन्यायाधीश CJI भूषण गवई यांनी त्यांच्या निवृत्तीपूर्वी केलेले वक्...
Continue reading
पाकिस्तान 27th Amendment मुळे लष्करप्रमुख असीम मुनीर अण्वस्त्रांची कमान हाताळणार; न्यायव्यवस्थेवर प्रहार, लोकशाहीवर परिणाम, विरोधकांचा तीव्र विरोध.
पाकिस्तानमध्ये 27 व्या घटनादुरु...
Continue reading
🇮🇳 India On Pakistan Nuclear Testing : ट्रम्पनी पाकिस्तानच्या गुप्त अणवस्त्र चाचण्यांचा पर्दाफाश केल्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड
Continue reading
Air India Crash: सर्वोच्च न्यायालयाने पायलटवर आरोप न करता दिला आधार, विद्युत अपयशामुळे अपघाताची शक्यता
अहमदाबाद येथील Air India Boeing 787 Dreamline...
Continue reading
प्रतिक्षा संपणार? आज राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद; महापालिका निवडणुकींच्या बिगुलाची शक्यता
निवडणूक हा शब्द उच्चारला की लोकशाहीची खरी परीक्षा, ज...
Continue reading
“लोखंडी हाताने कारवाई होणार”: Digital Arrest घोटाळ्यावर सर्वोच्च न्यायालयाचा इशारा
पीडितांकडून तब्बल ३,००० कोटी रुपये वसूल; न्यायालयाने केंद्र, राज्यांना पाचारण केलं
देशात झपाट्...
Continue reading
stray कुत्र्यांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा राज्य सरकारांना फटकारा; म्हटलं – “देशाची प्रतिमा मलिन झाली आहे”
सर्वोच्च न्यायालयाने stray कुत्र्यांच...
Continue reading
महापालिका निवडणुकीनंतर त्यांचा पक्ष? — संजय राऊतांचा शिंदे गटाबद्दल मोठा गौप्यस्फोट आणि त्याचे अर्थ
मुंबई — शिवसेना (उद्धव भाग)चे खासदार आणि भाष्यकार संजय
Continue reading
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर शनिवारी रात्री घडलेल्या
चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
तर अनेकजण जखमी झाले आहेत.
स्थानकावर प्रयागराजला निघालेल्या प्...
Continue reading
Delhi Election Result 2025 : दिल्लीतील मुस्लीम विधानसभा मतदारसंघात देखील भाजपचा डंका पाहायला मिळत आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी (दि. 08) सकाळी आठ वाजेपासून सु...
Continue reading
‘सरकारी वकिलांच्या गंभीर त्रुटी आणि कर्तव्याप्रति निष्काळजी यांचे भान न्यायालयाने ठेवावे, एखाद्या व्यक्तीविरोधातील गुन्हा हा संपूर्ण समाजाच्या विरोधातील गुन्हा आहे. त्यामुळे सरकारी वकील किंवा कनिष्ठ न्यायालयांचे पीठासीन अधिकारी यांनी कोणत्याही प्रकारे निष्काळजी किंवा कसूर करणे परवडणारे नाही,’ असेही सर्वोच्च न्यायालयाने सुनावले.
नियुक्त्यांमध्ये राजकारणाला थारा नको
‘सरकारी वकिलांची सेवा आणि न्यायपालिका यांच्यातील संबंध हा फौजदारी न्याय व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. त्यामुळे सरकारी वकील पदावर नियुक्तीसारख्या बाबींमध्ये राजकारणाला थारा मिळू नये,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले.
काय आहे प्रकरण?
पत्नीच्या हत्येप्रकरणी झालेल्या जन्मठेपेच्या शिक्षेविरोधात अर्जदाराने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या जोडप्याची पाच वर्षांची मुलगी हत्येच्या गुन्ह्याची एकमेव साक्षीदार होती. सुनावणीदरम्यान ही अल्पवयीन मुलगी साक्ष देऊ न शकल्याने तिला उलटलेला साक्षीदार म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, ‘अर्जदाराने निशस्त्र, असहाय पत्नीवर चाकूने १२ वार केले होते, ही बाब दुर्लक्षित करण्याजोगी नाही,’ असे म्हणून न्यायालयाने शिक्षेविरोधातील अपील फेटाळले.