बाल संरक्षण आणि सुरक्षा कार्यशाळेचे विद्यांचल द स्कुल येथे यशस्वी आयोजन

बाल संरक्षण आणि

अकोट : विद्यांचल द स्कुल येथे बालकांचे हक्क, अधिकार, सुरक्षितता आणि कल्याण याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी ‘बाल संरक्षण व सुरक्षा’ या विषयावर कार्यशाळेचे भव्य आयोजन १७ नोव्हेंबर रोजी करण्यात आले. मुलांच्या हिताचे रक्षण, शोषण व गैरवापरापासून संरक्षण, तसेच सायबर सुरक्षेबाबत आवश्यक मार्गदर्शन देणे या उद्देशाने ही कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरली.

या कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्रीमती प्रांजली जैस्वाल (सदस्य – बालकल्याण समिती), ऍड. मनीषा भोरे (सेंटर हेड – सखी वन स्टॉप सेंटर), श्री. सुनिल लाडुलकर (जिल्हा बालसुरक्षा आणि कल्याण अधिकारी, अकोला), श्री. महेंद्र गनोदे (चेअरमन – एनकरेज एज्युकेशनल फाऊंडेशन, अकोला) व सौ. प्रिया इंगळे (सखी वन स्टॉप सेंटर, अकोला) यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बालहक्कांचे महत्त्व स्पष्ट करताना कोणत्याही प्रतिकूल किंवा संशयास्पद परिस्थितीत मुलांनी कसे वागावे, स्वतःचे रक्षण कसे करावे आणि परिस्थितीची योग्य जाणीव करून ती हाताळण्याची कौशल्ये कशी विकसित करावी याबाबत मार्गदर्शन केले. वाढत्या सोशल मीडिया वापरातून उद्भवणारे धोके, सायबर फसवणूक, आणि चुकीच्या सवयी टाळण्याबाबतही त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली. एखाद्या मुलासोबत गैरप्रकार किंवा अत्याचार घडल्यास तात्काळ संपर्क साधता येणारे महत्त्वाचे हेल्पलाइन क्रमांक विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले.

Related News

कार्यशाळेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यांनी कार्यशाळेचे महत्त्व समजून घेत सक्रियपणे सहभाग नोंदवला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय डीन श्री. प्रशांत विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी समन्वय साधत परिश्रम घेतले. अशा कार्यशाळांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये स्वसंरक्षण, जागरुकता आणि सुरक्षिततेची जाण वाढीस लागते, असे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.

read also :  https://ajinkyabharat.com/shantiniketan-english-school-players-get-impressive-selection-for-the-state-level-yogasana-competition/

Related News