अकोला महानगरपालिकेच्या निवडणूक निकालानंतर महापौरपदासाठी विविध पातळ्यांवर चर्चा सुरू आहेत. मात्र या चर्चांमध्ये तथ्यांपेक्षा अफवांना अधिक स्थान दिले जात आहे, हे दुर्दैवी आहे. आज भाजपचे माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांची सदिच्छा भेट घेतली. ही भेट पूर्णतः सामाजिक आणि औपचारिक स्वरूपाची होती. वाढदिवसासारख्या प्रसंगी शुभेच्छा देणे ही महाराष्ट्राची संस्कृती आहे, त्याला राजकीय अर्थ काढणे योग्य नाही.
महापौरपदाबाबत सध्या अनेक नावे चर्चेत आहेत, मात्र कोणताही अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. अपक्ष नगरसेवक आशिष पवित्रकार यांना काँग्रेसकडून ऑफर असल्याच्या चर्चा माध्यमांतून पसरवल्या जात आहेत, पण त्या संदर्भात अधिकृतरीत्या काहीही ठरलेले नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही नेहमीच संवाद साधतो, भेटीगाठी होतात, त्यातून लगेचच राजकीय समीकरणे जोडणे हे चुकीचे ठरते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. अकोल्याच्या विकासासाठी सक्षम, स्वच्छ प्रतिमेचा आणि सर्वांना सोबत घेऊन काम करणारा महापौर निवडला गेला पाहिजे. जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखून स्थिर आणि विकासाभिमुख महापालिका चालवणे हेच आमचे प्राधान्य आहे.
Related News
आम्ही कोणत्याही प्रकारच्या फोडाफोडीच्या राजकारणावर विश्वास ठेवत नाही. योग्य वेळी योग्य निर्णय होईल आणि तो निर्णय अकोल्याच्या हिताचा असेल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या चर्चांवर जनतेने संयम ठेवावा. लवकरच महापौरपदाबाबत सकारात्मक आणि “गोड” बातमी अकोल्याला नक्कीच कळेल, एवढेच मी सांगू इच्छितो.
read also : https://ajinkyabharat.com/shri-jageshwar-vidyalaya-completed-various-cultural-programs/
