अकोट
श्री जी कॉलनी स्थित सेंट पॉल्स अकॅडमी येथे वर्ग 10 वी च्या विद्यार्थ्यांचा
निरोप समारंभ सोहळा आयोजित करण्यात आला. सर्वप्रथम भवाने सर व चेडे सर यांनी
Related News
अकोट ग्रामीण पोलीसांची जलद कारवाई – विनयभंग प्रकरणातील आरोपीविरोधात २४ तासांत दोषारोपपत्र दाखल
शिवसेना (उबाठा) मध्ये नेतृत्वबदलामुळे पक्षातील अंतर्गत कलह आणखी गडद होणार
दोन कोटी विस लाखां च्या नावाखाली रुग्णसेवकाला सायबर गुंड्याकडून गंडवण्याचा प्रयत्न
शाळांचे परिसर एका महिन्यात तंबाखूमुक्त करण्याचे आदेश
अतिक्रमण हटाव मोहीम का फक्त दुर्बळांवरच? अपंगाचे दुकान तोडले –
जुन्या वादातून दोन गटात झालेल्या शस्त्रास्त्र हाणामारी
अकोल्यात विविध मागण्यांसाठी आज धरणे आंदोलन करणाऱ्यात आले
नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये पार पडलेल्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री पीयूष गोयल
अखेर कातखेड,पिंपळखुटा गावात रस्त्याच्या कामाला सुरुवात
शेलुबाजार आरोग्य केंद्रात क्षयरुग्ण तपासणी शिबिर; डिजिटल एक्स-रेद्वारे ८७ संशयितांची तपासणी
पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह
अखेर लेखी आश्वासनाने उपोषणाची मांघार!
पाहुण्यांचे व विद्यार्थ्यांचे स्वागत कुमकुम तिलक लावून केले.
कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
त्यानंतर डॉ.रायबोले मॅम व चेडे सर यांच्या टिमने सुंदर असं स्वागत गीत सादर केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव प्रमोद चांडक तर प्रमुख अतिथी म्हणून
संस्थेचे अध्यक्ष नवनीत लखोटीया उपाध्यक्ष लूणकरन डागा संस्था सदस्य दिपम लखोटीया,
अवनी लखोटीया,नूतन डागा शाळेचे मुख्याध्यापक विजय बिहाडे उपमुख्याध्यापिका ममता श्रावणी,
रिंकू अग्रवाल पर्यवेक्षक अभिजीत मेंढे,सारिका रेळे,प्रभुदास नाथे यांची उपस्थित लाभली
त्यानंतर विद्या नळे,वनिता थोरात,जयश्री हिंगणकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना त्यांच्या बॅचचा
फोटो असणारी आकर्षक स्मरणीय भेटवस्तू देण्यात आली.श्वेता निखाडे,कार्तिक शर्मा यांनी आतापर्यंतचा
आपला शाळेचा प्रवास यावर आपले मत प्रकट केले.तसेच दिपम सर,नवनीत सर,विजय सर,गावंडे सर,
वनिता थोरात यांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मार्गदर्शन केले.
प्रमोद चांडक यांनीही आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांनी आपले ध्येय कसे साधावे यावर आपले मत व्यक्त केले.
डॉ.रायबोले मॅम यांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जया लाडोळे,
रिया दामोदर,धनश्री मोरे,तसेच आभार प्रदर्शन भाविका लोणकर यांनी केली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्या नळे,
यामिनी पाटील,जयश्री हिंगणकर,वनिता थोरात,नितीन गावंडे,अभिजीत मेंढे,
अगस्ती ठाकूर,सुदर्शन अंबोरे तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही अथक परिश्रम घेतले.
Click here for more updates : https://ajinkyabharat.com/anxiety-vadhali-comes-a-nakhi-a-navan-crisis-imdicdoon-or-jilhiyana-red-alert/