मुंबई | प्रतिनिधी —
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-कश्मीरमधून मायभूमीकडे
परतण्यासाठी पर्यटकांची एकच झुंबड उडाली आहे. मात्र, या संकटकाळात काही
Related News
मल्टी-अॅसेट फंड पोर्टफोलिओमध्ये विविधतेसाठी तज्ज्ञांचा सल्ला
मल्टी-अॅसेट फंड हे गुंतवणूकदारांना विविध मालमत्ता वर्गांमध्ये पोर्टफोलिओ डायव्...
Continue reading
अजित पवार यांचा विमान अपघात : नेत्यांकडून शंका, चौकशीची मागणी जोर धरत
माजी केंद्रीय मंत्री आणि महाराष्ट्राचे नेते अजित पवार यांचा विमान अपघाताची घट...
Continue reading
घरात नकारात्मक ऊर्जा वाढत आहे? फक्त या दोन वस्तूंचा वापर करून सकारात्मक ऊर्जा वाढवा – वास्तुशास्त्र आणि फेंगशुईतून सोपे उपाय
आजच्या धकाधकीच्या आयुष्यात, प्रत्येकजण आपल्या घरात शां...
Continue reading
सोनं आणि चांदीच्या भावात मोठी घसरण; दागिने खरेदीसाठी योग्य वेळ?
जळगाव – मागील काही दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात चढउतार...
Continue reading
जीभेवरील पांढरा थर: आरोग्याचा इशारा किंवा सामान्य समस्या?
जिभेवरील पांढऱ्या थरामुळे उद्भवणाऱ्या आजारांप...
Continue reading
बँक लॉकरमध्ये ठेवलेले सोने किती सुरक्षित? RBIच्या नियमांनुसार संपूर्ण माहिती जाणून घ्या
आजच्या काळात सोने, दागिने, महत्त्वाची कागदपत्रे यांसारख्या मौल्यवान वस्तू सुरक्षित ठेवण्यास...
Continue reading
Today’s Gold Rate: वाह! सोन्याचा भाव आपटला, लगेच खरेदी करा; आज १० ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागणार?
सर्वसामान्यांसाठी आजचा दिवस अत्यंत दिलासादायक ठरला आहे. गेल्या काही महि...
Continue reading
Holi 2026 Date: चंद्रग्रहणामुळे होळी कधी साजरी होणार? पंचांगानुसार जाणून घ्या संपूर्ण माहिती
Holi 2026 Date: होळी हा सण भारतात उत्साह, आनंद आण...
Continue reading
Share Market चे धुरंधर! 6 दिवसांत 76 टक्क्यांचा तुफान परतावा, गुंतवणूकदारांनी गोण्या भरून कमावला पैसा
Multib...
Continue reading
विमान कंपन्यांनी तिकीट दरात प्रचंड वाढ केल्याने नेटीझन्समधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
श्रीनगरहून मुंबई आणि इतर शहरांकडे जाणाऱ्या विमानांचे तिकीट दर तब्बल तीनपट वाढले आहेत.
काही प्रवाशांनी सोशल मीडियावर स्क्रीनशॉट शेअर करत 56,000 रुपयांपर्यंत वाढलेले तिकीटदर दाखवले आहेत.
संकटकाळात ‘संधी’ शोधणाऱ्या या प्रवृत्तीवर नेटीझन्सनी कठोर शब्दांत टीका केली आहे.
ही बाब लक्षात घेत नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) ने 23 एप्रिल रोजी महत्वाचे आदेश
जारी करत विमान कंपन्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. तिकीट दर न वाढवणे,
तसेच तिकीट रद्द/पुन्हा बुकिंगसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.
याशिवाय, श्रीनगरहून मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त विमानांची व्यवस्था करण्यात आली आहे.
एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी मिळून श्रीनगरहून उड्डाण करणारी चार अतिरिक्त विमाने उपलब्ध करून दिली आहेत,
त्यातील दोन मुंबईसाठी आणि दोन दिल्लीसाठी असणार आहेत.
सध्या हजारो पर्यटक आणि अमरनाथ यात्रेसाठी आलेले भाविक श्रीनगरमध्ये अडकले आहेत.
त्यांच्यासाठी ही अतिरिक्त सेवा उपयोगी ठरणार आहे. DGCA च्या आदेशामुळे काहीसा दिलासा मिळाला असला,
तरी एअरलाईन्सकडून ‘संकटात नफा’ हे वर्तन थांबवण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/dhavatiya-cruel-stomach/