एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने स्मिता सुतवणे यांचा जाहीर सत्कार

एसटी

अकोला – स्थानिक विभाग नियंत्रक कार्यालयात सोमवारी, 23 मार्च 2026 रोजी एसटी कष्टकरी जनसंघाच्या वतीने नवीन विभाग नियंत्रक सौ स्मिता सुतवणे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष एसटी बँक संचालक अजित मगरे उपस्थित होते.

कार्यक्रमात स्मिता सुतवणे यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना सलग सेवा सुरु ठेवण्याचे महत्त्व समजावून सांगितले व त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.

तसेच कर्मचाऱ्यांसोबत सेवेत सुधारणा आणण्यासाठी चर्चा झाली आणि त्याबाबत निवेदन सादर करण्यात आले. कार्यक्रमात एसटी कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी सचिन हाताळकर, अमोल वैद्य, आशिष निकाळजे, शिवानंद तराळे, समाधान अंभोरे, देवेंद्र पवार, सुरेश सानप, देवेंद्र बिहाडे, सुधीर वाहोकार आणि विठ्ठल बोरसे उपस्थित होते.

Related News

read also :  https://ajinkyabharat.com/ssc-paper-checking-case-sahavichya-mulinkadanu-10th-paper-checking-allegation-suspension-action-against-the-complainant-employee/

Related News