रूईखेड येथील श्री बागाजी विद्यालय व श्रीराम कानिष्ठ महाविद्यालयात ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा

श्रीराम कानिष्ठ महाविद्यालयात

अकोट, २६ जानेवारी: अकोट तालुक्यातील रूईखेड येथील नवयुवक शिक्षण प्रसारक मंडळाद्वारे चालविले जाणारे श्री बागाजी विद्यालय आणि श्रीराम कानिष्ठ महाविद्यालयात आज ७७ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.

सदर कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या संचालक आणि माजी मुख्याध्यापिका संगीता मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आली. यानंतर विविध सांस्कृतिक आणि क्रीडा कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. वार्षिक स्नेहसंमेलन आणि क्रीडा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने सत्कार केला गेला. तसेच शालेय स्तरावर देशभक्तीपर गीतांवर आधारित कविता वाचनाचे कार्यक्रमही आयोजित करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त कर्मचारी छाया पन्नासे उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल मांडवे यांनी केले, तर आभार प्रदर्शन संतोष काळे यांनी केले.

Related News

सदर कार्यक्रमात विद्यालयाचे मुख्याध्यापक निनाद मानकर, अनिता भराटे, किरण मानकर, वनिता सरोदे, तसेच शिक्षक व प्रशासनिक कर्मचारी संतोष काळे, विशाल मांडवे, मंजुषा साठे, अनिल ओखारे, प्रा. रूपेश गायगोले, प्रा. राहुल खंडारे, प्रशांत मानकर, संगीता पन्नासे, संगीता नाथे, प्रतिक्षा सदार, जान्वी गाठेकर, तसेच इतर शिक्षक कर्मचारी विठ्ठल फाळके, गजानन घुगे, अविनाश सुकोशे, राजु पवार, मंदा पवार उपस्थित होते. याशिवाय विद्यार्थ्यांबरोबर पालक वर्ग आणि गावकरीही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी प्रजासत्ताक दिनाची महती उजागर केली आणि उपस्थितांना भावनिक क्षण अनुभवायला मिळाले.

read also : https://ajinkyabharat.com/pride-of-veer-eklavya-emergency-research-and-rescue-path-kacha-district-magistrates/

Related News