पातूर : संत गजानन महाराजांची पालखी ७ जून रोजी पातूरला पोहचणार असून स्वागतासाठी
जय्यत तयारी करण्यात आली आहे.श्री गजानन महाराज संस्थानच्यावतीने श्रींच्या पालखीचे श्रीक्षेत्र
पंढरपूर पायदळ वारीकरिता भजनी दिंडी गज व अश्वासह २ जून रोजी ७०० च्यावर वारकऱ्यांसह मार्गस्थ झाली होती.
Related News
सीरियातील प्रसिद्ध कॅफेत भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू, 20 जखमी, दमिश्क हादरले
सीरियाची राजधानी दमिश्कमध्ये गुरुवारी झालेल्या भीषण स्फोटामुळे संपूर्ण शहरात भीतीचे वातावरण निर्माण झा...
Continue reading
क्रिस्टियानो रोनाल्डोच्या AI अॅनिमे व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. निर्णायक सामन्यापूर्वी व्हायरल झालेल्या या भावनिक व्हिडिओमागची संपूर्ण...
Continue reading
'तारक मेहता' फेम शैलेश लोढा यांच्या लेकीचं शाही लग्न; डान्स, गाणी आणि व्हायरल VIDEO ने जिंकली मनं
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय मालिकेत 'तारक मेहता'ची भूमिका साकारून घरा...
Continue reading
राजकोट हत्याकांड: सोशल मीडियावरील प्रेमाची 7 धक्कादायक सत्ये! पत्नी समजलेल्या व्यक्तीचा निघाला पुरुष, संतापातून खून
गुजरातमधील राजकोट येथे सोशल मीडियाव...
Continue reading
'इंडियाज गॉट लेटेंट 2'मध्ये आलिया भट्टने पैसे घेऊन सहभाग घेतला का? विद्यार्थ्याच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं भन्नाट उत्तर. जाणून घ्या सं...
Continue reading
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताची खराब सुरुवात झाल्यानंतर संजू सॅमसन आणि इशान किशन पुन्हा अपयशी ठरले. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या...
Continue reading
मुंबईत उघड्या मॅनहोलचा बळी | अंधेरीत 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून व्यक्तीचा मृत्यूमुंबईतील अंधेरी-साकीनाका परिसरात 25 फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये पडून...
Continue reading
सचिन अहिर यांच्या शिवसेना (शिंदे गट) प्रवेशामागे देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी, उपसभापतीपदासाठी झालेल्या हालचाली, ऑपरेशन टायगर आणि दोन उद्योगपतींच्या ...
Continue reading
WhatsApp Username Feature 2026 मुळे गोपनीयता आणि सायबर सुरक्षेबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. मनीष सिसोदियांना स्वतःच्या नावाचे U...
Continue reading
अकोला तालुका कृषी अधिकारी कार्यालयात आत्मा अंतर्गत तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीची बैठक उत्साहात पार पडली. किशोर काकडे यांची अध्यक्षपदी अविरोध निवड ...
Continue reading
धावत्या ट्रेनमध्ये उलटा लटकला तरुण; व्हायरल रीलचा धक्कादायक VIDEO पाहून नेटकरी हादरले
सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्या थराला जाऊ शकतात, याची प्रचिती देणारा एक धक्कादाय...
Continue reading
दरम्यान ७ जून रोजी ऐतिहासिक पातूर शहरात लाखो भाविकांसह दाखल होणार आहे.
श्रींच्या पालखी सोहळ्याचे हे ५६ वे वर्ष आहे. श्रींच्या पालखीने अकोला जिल्ह्यात आगमन केले आहे.
टाळकरी विठ्ठल नामाचा महिमा गात श्री गजानन महाराजांचा नामघोष करीत पातूर शहरातून नगरपरिक्रमा करुन
पंचायत समिती पातूर येथे मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी मेडशी कडे मार्गस्थ होणार आहे.
पातूर ते मेडशी या १५ की.मी. अंतरावर भक्तांचा भक्तीसागर श्रींच्या पालखी समवेत हा पाहावयास मिळणार आहे.
पातूर पंचायत समितीच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाकडून दरवर्षी स्वखर्चाने जेवण,चहापाण,
फराळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था व आरोग्य तपासणी व पालखी मुक्काम बाबत तयारी होत आहे.
पातूर नगरीत पातूर पंचायत समितीच्या परिसरात श्रींच्या पालखीसमवेत येणाऱ्या भाविकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.
श्रींच्या पालखीची नगरपरिक्रमा ७ जून रोजी दुपारी २ वाजता पातूर शहरात सुरुवात होईल.
याठिकाणी भक्तांच्या उपस्थिती वारकऱ्यांचा टाळ मृदंगाच्या तालावर श्रींचा नामघोष विठ्ठल नामाचा
जयघोष हरिनामाचा नामघोष करीत पारंपारीक मार्गाने श्रींची पालखीचे स्वागत होवून सायंकाळी श्रींच्या
मंदिरात पालखी सोहळा पंचायत समिती येथे पोहचणार आहे.
संत श्री. गजानन महाराज पालखी सोहळ्याची सुरुवात झाल्यापासून पातूर पंचायत
समितीचे अधिकारी व कर्मचारी पालखीचे स्वागत व मुक्कामाची व्यवस्था स्वखर्चाने करीत असून यावर्षी देखील
पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू असून पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी सुनीता इंगळे,
सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत लव्हाळे,शाखा अभियंता विट्ठल शिंदे,सहाय्यक प्रशासन अधिकारी उल्हास घुले,
रमेश ठाकरे,शशिकांत उमाळे,दामोदर झटाळे, तुकाराम गंधारे,वसंत चव्हाण,जनार्धन खुळे, कृषी अधिकारी
एम.एम. जोशी,कांताबाई पोहरे,लिलाबाई ठाकरे,ऋणाली डीवरे,रेखा खोकले,साळुंके मॅडम,गाडगे मॅडम,
ओम पुरी,श्रीकृष्ण लोखंडे,प्रविण डाबेराव,अंकुश ठाकरे,कनिष्ठ अभियंता निलेश मोरे,मयूर राऊत,
सुरेश तांदळे, आदी कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/bharatasathi-abhimanacha-pal-rafael-ladhau-vimanacha-dhacha-comes-to-india-tayar-honar/