नवी दिल्ली: भारत आणि फ्रान्समध्ये राफेल विमान निर्मितीसंदर्भात ऐतिहासिक करार झाला असून,
यानुसार राफेल जेटचा संपूर्ण ढाचा आता भारतातच तयार होणार आहे.
टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स हैदराबादमध्ये आधुनिक उत्पादन सुविधा उभारणार आहे.
Related News
जय बजरंग व्यायाम शाळेचा ग्रामीण क्रांतीचा यशस्वी प्रवास!
नुकसान ग्रस्त ठिकाणी आमदार नितीन देशमुख यांची सदिच्छा भेट
बच्चू कडूंचे आंदोलन स्थगित; २ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत तर मंत्रालयात घुसणार
पावसाळ्यामुळे तीन महिन्यांचे रेशन मिळणार….
अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघात: टेकऑफनंतर 650 फूटवरच ‘मेडे कॉल’, ATC शी संपर्क अपयशी; ब्लॅक बॉक्स हस्तगत
PM किसान योजनेची २०वी हप्ताची प्रतीक्षा संपणार! २० जूनला येऊ शकतो २००० रुपयांचा हप्ता
प्रवाशी वाहनात माल वाहतूक
मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे आठवडी बाजार मार्केट मध्ये घाणीच साम्राज्य!
अकोल्यात ‘रोड सेफ्टी व्हिजन’ मोहिमेच्या माध्यमातून वाहतूक जनजागृतीला जोर
बोर्डी,रामापूर,शिवपूर,परीसरात गारपिटमुळे हजारो क्षेत्र बाधित
आयाची तत्परता आणि देवाची कृपा,विमान अपघातातून चिमुकली बचावली
हेरिटेज हॉटेलमधील लग्नसोहळ्यात चोरी! – 2 लाख 43 हजारांचा ऐवज लंपास; चोरटा सीसीटीव्हीत कैद
भारताच्या संरक्षण आणि एअरोस्पेस उद्योगासाठी एक ऐतिहासिक क्षण ठरलेली
भागीदारी नुकतीच साकारली गेली आहे. फ्रान्समधील प्रमुख संरक्षण कंपनी दसॉ एव्हिएशन आणि
भारतातील टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स लिमिटेड यांनी राफेल लढाऊ विमानाच्या ढाच्याच्या
(फ्यूजेलाज) उत्पादनासाठी चार महत्त्वाचे करार केले आहेत.
या करारानुसार राफेल जेटचा संपूर्ण फ्यूजेलाज आता भारतातच तयार केला जाणार आहे.
या करारांतर्गत टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टिम्स हैदराबादमध्ये एक अत्याधुनिक उत्पादन केंद्र उभारणार आहे.
येथे राफेलच्या पिछल्या भागाच्या शेल्स, संपूर्ण रियर सेक्शन, मध्य भाग आणि पुढील सेक्शन यांसह
अनेक महत्त्वाचे घटक तयार केले जातील. 2028 पासून येथे उत्पादन सुरू होण्याची शक्यता आहे.
सुरुवातीला दर महिन्याला दोन संपूर्ण फ्यूजेलाज या युनिटमधून बाहेर पडू शकतील.
ही पहिलीच वेळ असेल की राफेल विमानाचा ढाचा फ्रान्सबाहेर भारतात तयार होईल.
त्यामुळे विकसित देशांच्या रांगेत बसण्याची संधी भारताला मिळणार आहे.
Read Also :
https://ajinkyabharat.com/jalna-jilahyatil-governmental-rugnalayal-ranka-type-samor/