बाळापूर, 21 फेब्रुवारी 2026 – बाळापूर शहरातील ड्रीम स्वेअर अकॅडमीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती व संविधान गुण गौरव परीक्षा – 2025 च्या बक्षिस वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले.
बाळापूर नगर परिषद उपाध्यक्ष सुरेंद्र धोपटे म्हणाले की, आधुनिक लोकशाही व्यवस्थेसमोर भ्रष्टाचार, असमानता आणि प्रशासकीय दिरंगाईसारखी आव्हाने उभी आहेत. अशा परिस्थितीत, छत्रपती शिवाजी महाराजांनी ३५० वर्षांपूर्वी राबवलेली राज्यकारभाराची पद्धत आजही मार्गदर्शक ठरू शकते. त्यांनी सत्ता गाजवण्याऐवजी रयतेचे हित केंद्रस्थानी ठेवून आखलेली धोरणे ही खऱ्या अर्थाने लोकशाही बळकट करण्याचा पाया ठरू शकतात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्कर भोजने, फुले-आंबेडकर विद्वत सभेचे राज्य समन्वयक, यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे ऐतिहासिक योगदान आणि रयतेसाठी केलेल्या पराक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी सांगितले की, महाराजांनी जातीच्या पलिकडे जाऊन राज्यकारभार चालविला; आज देशात जातीच्या नावाने जनतेला भडकवण्याचे काम केले जात आहे. लोकशाही टिकवायची असेल, तर संविधानाच्या बाजूने उभे राहावे लागेल.
Related News
अकोट (दि. ११ फेब्रुवारी २०२६): स्थानिक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, अकोट येथील अर्थशास्त्र विभागाच...
Continue reading
उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हाता गावात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोड्यांची मालिका राबवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दि. १६...
Continue reading
दिनांक 17 जानेवारी 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कळंबा खुर्द येथे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आनंद मेळावा उत्साहात साज...
Continue reading
बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथे निगूर्णा नदी पात्रात उभारण्यात आलेल्या कोल्हापूरी बंधाऱ्याचे एक गेट अज्ञात व्यक्तींनी फोडल्याची गंभीर घटना समोर आ...
Continue reading
बाळापूर : लोहारा (ता. बाळापूर) येथील ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नातून दिव्यांगांसाठी राखीव असलेला पाच टक्के निधी
Continue reading
बाळापूर : बाळापूर शहराच्या मध्यवर्ती भागात मंगळवारी सायंकाळी सुमारे ५ वाजताच्या सुमारास एक मारोती ओमनी गाडी अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच खळबळ उडाल...
Continue reading
अकोट : महान भारतीय गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २२ डिसेंबर रोजी साजरा होणाऱ्या राष्ट्रीय गणित दिनाचे औचित...
Continue reading
Zilla Parishad Schools : कमी विद्यार्थी असलेल्या शाळा बंद होणार नाहीत, असे मंत्री जयकुमार गोरे यांनी आश्वासन दिले. शिक्षकांची रिक्त पदे ...
Continue reading
शिक्षक पात्रता परीक्षा (TET) आज राज्यभरात होत असताना अकोला जिल्ह्यात एक गंभीर प्रकार समोर आला आहे. खंडेलवाल ज्ञानमंदिर शाळा या परीक्षा केंद्रावर दहा मिनि...
Continue reading
TET Exam Shocking Order : महाराष्ट्रातील शिक्षकांना ‘पदोन्नती नको!’ – मुंबई उच्च न्यायालयाचा प्रशासनांना धडाकेबाज आदेश
महाराष्ट्रातील ...
Continue reading
उरळ पोलीस स्टेशन अंतर्गत दिनांक १० नोव्हेंबर रोजी पाच वेगवेगळ्या ठिकाणी अवैध गावठी दारू धंद्यावार कारवाई करण्यात आली आहे. या कारवाई...
Continue reading
मुंबईतील संतापजनक प्रकार : हातावर मेहंदी लावली म्हणून विद्यार्थिनींना वर्गाबाहेर! पालकांचा संताप; शिक्षण विभागाने शाळेला दिली नोटीस
मुंबई : नुकताच दिवाळीचा सण पार पडला.
Continue reading
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डाॅ. मोहम्मद फय्याज हुसैन यांनी विद्यार्थ्यांना सातत्याने परिश्रम घेण्याचे महत्त्व सांगितले आणि अकॅडमीला शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या कामासाठी प्रोत्साहन दिले. नगरसेवक संजय उमाळे व ॲड. प्रशांत उमाळे यांचाही समारंभात सहभाग होता.
समारंभाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ड्रीम स्वेअर अकॅडमीचे संचालक प्रा. विश्वजीत वानखडे यांनी केले, तर आभार प्रा. उमेश जाधव यांनी मानले. यावेळी विद्यार्थ्यांना संविधान गुण गौरव परीक्षा – 2025 मध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.
समारंभात रोशन दामोदर, निखिल उमाळे, प्रेम तायडे, विजय उमाळे, संजना उमाळे, रोहिणी राऊत, प्रतीक्षा उमाळे, प्रज्ञा तायडे, अश्मिरा शेख, पूर्वा पोते यांसह अनेक विद्यार्थी उपस्थित होते.
read also : https://ajinkyabharat.com/rouble-nagi-global-teacher-prize-2026-proud-historical-victory-worth-1-million-dollars-powerful-honor/