उरळ पोलिस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या हाता गावात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोड्यांची मालिका राबवून गावात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. दि. १६ जानेवारी रोजी रात्री १ ते १.३० वाजण्याच्या सुमारास दोन ते तीन घरे फोडून चोरट्यांनी सोने, चांदी व नगदी असा सुमारे ८ ते ९ लाख रुपयांचा ऐवज लुटून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
या घटनेमुळे संपूर्ण गावात खळबळ उडाली असून, गजबजलेल्या वस्तीतील घरेही सुरक्षित नसल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
हाता येथील अनंता गोविंदराव कुचके यांच्या घराचे कुलूप फोडून चोरट्यांनी घरातील जुनी तिजोरी उघडली. त्यातून सोने-चांदीचे दागिने व नगदी रक्कम मिळून सुमारे ६ ते ७ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे.
Related News
राम मंदिर देणगी चोरी प्रकरणात मोठा ट्विस्ट; तिघांना क्लिनचिट, चार्जशीटमधून नेमकं काय समोर आलं?
उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी चोरी प्रकरणात मोठी अपडेट समोर आल...
Continue reading
पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात सिया गोयलच्या साखरपुड्यातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 'तो माझा हिरो नंबर वन' म्हणत केलेल्या कौतुकापासून गुप्त विवाहाच्या दाव्यांपर्यंत आणि केत...
Continue reading
‘सिया संस्कारी आहे असं सांगून लग्न जमवलं’, केतन अग्रवालच्या वडिलांचा मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप; चौकशीची मागणी
पुण्यातील लोहगडावर झालेल्या केतन अग्रवाल हत्या प्रकरणाने संपूर्ण रा...
Continue reading
केतन अग्रवाल प्रकरणात नवे धक्कादायक दावे; सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत तपासात समोर आले नवे तपशील
पुण्यात चर्चेत असलेल्या केतन अग्रवाल प्रकरणात तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे अनेक...
Continue reading
अमायरा प्रकरण: 9 वर्षांच्या चिमुरडीने 5 वेळा मागितली मदत, शिक्षिकेने डावलले; CCTV फुटेजमधून समोर आला शेवटचा 48 फूटांचा प्रवास
राजस्थानातील जयपूर येथील एका नामांकित...
Continue reading
मिरा-भाईंदरमध्ये ११ वर्षीय शाळकरी मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैद्यकीय तपासणीत ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे उघड झाले असून आरोपीविरोधा...
Continue reading
धावत्या स्कूल व्हॅनमधून 4 मुले रस्त्यावर पडली; CCTV फुटेज व्हायरल, सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
बंगळुरू: शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आ...
Continue reading
पुण्यातील केतन अगरवाल हत्या प्रकरणात आरोपी सिया गोयलच्या आई-वडिलांनी प्रथमच मौन सोडले. सियाची तब्बल 10 वेळा संमती घेतल्यानंतरच लग्न ठरवले, असा दावा त्यांनी केला. जाणून घ्या संपूर्ण...
Continue reading
Badlapur Murder Case : 15 वर्षांच्या संसाराचा थरकाप! प्रेयसीसाठी पत्नीचा श्वास घोटून खून, पोस्टमार्टमने उघड केले 5 धक्कादायक सत्य
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये एका विवाहित महिलेच्...
Continue reading
केतन अगरवाल हत्या प्रकरणात पोलीस चौकशीदरम्यान सिया गोयलने पहिल्यांदाच मोठा दावा केला आहे. चेतन चौधरीसोबतच्या प्रेमसंबंधाची माहिती केतनला आधीच दिल्याचा दावा सियाने केला असून या प्रक...
Continue reading
Ketan Agarwal Murder: 26 वर्षीय संचालकाच्या हत्येमागील 8 धक्कादायक सत्य समोर
पुण्यातील रिअल इस्टेट व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या हत्येप्रकरणी होणारी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर ...
Continue reading
FDA-ANC ची धडाकेबाज कारवाई: पुण्यात 10,492 ट्रामाडोल कॅप्सूल जप्त; 2 जण गजाआड, मोठा ड्रग्ज रॅकेट उघडपुणे : राज्यात अमली पदार्थांच्या गैरवापरावर कठोर कारवाई सुरू असतानाच पुण्यात...
Continue reading
तसेच कांताबाई शालीकराम कुचके यांच्या घरातही घरफोडी करून सोने, चांदी व रोख रक्कम असा सुमारे दीड ते दोन लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.
याशिवाय बळीराम तळोकार यांच्या घरालाही चोरट्यांनी लक्ष्य केले असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, बाळासाहेब धर्माळे यांच्या घराजवळील आरसीसी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. मात्र, तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद होत असल्याचे लक्षात येताच त्यांनी तेथून पळ काढल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
चोरीनंतर पळून जाण्यासाठी चोरट्यांनी गावातीलच दोन दुचाकींचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. गौतम दामोदर आणि गणेश सुरसकार यांच्या दुचाकी गाड्या घेऊन चोरटे हाता-फाटा परिसरापर्यंत गेले व नंतर त्या रोहनकार यांच्या शेतात सोडून देऊन अंधाराचा फायदा घेत पसार झाले असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली आहे.
घटनेची माहिती मिळताच उरळ पोलिस स्टेशनचे ठाणेदार पंकज कांबळे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला असून, फॉरेन्सिक पथक मोबाईल व्हॅनसह तसेच श्वान पथकही काही वेळात घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे.
हाता गावासारख्या गजबजलेल्या वस्तीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरी झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीती व संतापाचे वातावरण आहे. रात्री गस्त वाढवावी, तसेच परिसरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
या घरफोडीतील चोरट्यांना जेरबंद करणे हे उरळ पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरणार असून, चोरीचा पुढील तपास पोलिस निरीक्षक पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कांईदे व इतर पोलिस कर्मचारी करत आहेत.
पोलीस लवकरच चोरट्यांचा छडा लावतील, असा विश्वास व्यक्त केला जात असला तरी, या घटनेने हाता गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/in-broad-daylight-from-a-scooter/