बोरगाव मंजू :
स्थानिक पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गजानन महाराज मंदिर सेवा समिती, लक्ष्मी नगर, बोरगाव मंजू यांच्या वतीने दरवर्षी धार्मिक तसेच सामाजिक उपक्रम मोठ्या भक्तिभावाने राबविले जातात. याच परंपरेला अनुसरून यंदाही बोरगाव मंजू ते शेगाव या मार्गावर संत गजानन महाराजांचा पायदळ पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला आहे.
दिनांक ११ जानेवारीपासून पुढील पाच दिवस हा पायदळ पालखी सोहळा संपन्न होत असून, पहिल्याच दिवशी हजारो भाविकांच्या उपस्थितीने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.
रविवारी सकाळी लक्ष्मी नगर येथील संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या चरणी विधिवत महापूजा, जलाभिषेक व आरती करून पालखी सोहळ्याला विधिवत प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गांवरून नगर परिक्रमा करत पालखी शेगावकडे मार्गस्थ झाली.नगर परिक्रमेच्या वेळी नागरिकांनी आपल्या घरासमोर स्वच्छता करून, सुंदर रांगोळ्या काढत, पुष्पवृष्टी करत पालखीतील श्री गजानन महाराजांच्या चरणी श्रद्धेने सेवा अर्पण केली. यावेळी संपूर्ण बोरगाव मंजू शहरात भक्तिमय, उत्साही व आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळाले.
पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांनी पांढरे शुभ्र वस्त्र, डोक्यावर टोपी, तर महिला सेवाधाऱ्यांनी पारंपरिक वेशात हातात टाळ घेत भजनसेवेत सहभाग नोंदविला. टाळ–मृदंगाच्या गजरात, “गण गणात बोते”, “जय गजानन श्री गजानन महाराज” या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला.या पायदळ पालखी सोहळ्यात चारशे ते पाचशे भाविक प्रत्यक्ष सहभागी झाले असून, मार्गात ठिकठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
Related News
मूर्तिजापूर : समता नगर येथील महाराष्ट्र संगीत विद्यालयात संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ मार्गदर्शक स्व. रामकृष्ण कोल्हाळे गुरुजी यांच्या पुण्यतिथीनिमित्त संगीतमय आदरांजली कार्यक्रम आयोज...
Continue reading
महिला आरक्षित व नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) प्रभागातील सदस्यांच्या जात वैधता प्रमाणपत्रां बाबत तक्रारी दाखल;बाळापूर ताप्र : गेल्या काही महीण्या आगोदर नगर परिषद निवडणु...
Continue reading
अकोट तालुक्यातील पिंप्री खुर्द ते करी या मार्गावरील रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने नागरिक, वाहनधारक आणि शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. क...
Continue reading
रामापूर (ता. अकोट) : अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रामापूर या गट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. येथील अल्पभूधारक श...
Continue reading
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू शेगाव दौऱ्यावर; संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन महा आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन
महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या, २५ फेब्रुवारी २०२६ रोजी संतनगरी श...
Continue reading
नगरपरिषद प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नगरपालिकेच्या जुन्या अग्निशमन दलाच्या उभ्या असलेल्या गाडीचे चाक अज्ञात इसमाने जॅकच्या साहाय्याने काढून ...
Continue reading
अकोट : शासकीय सार्वजनिक वाचनालय अकोट यांच्या वतीने आयोजित जिल्हा वार्षिक ग्रंथोत्सवानिमित्त ग्रंथ साहित्य संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात ग्रंथद...
Continue reading
समाजसेवेचा वसा जपत गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या सौ. संध्या अनिल डाहेलकर यांना डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीसंत गाडगेबाबा यांच्या ...
Continue reading
बोरगाव मंजू पोलिसांच्या हाती एका गंभीर जातीवाचक आणि धर्मभावना दुखावणाऱ्या शिवीगाळ प्रकरणाची तक्रार आली आहे. या प्रकरणात रोशन चौधरी याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. बोरगाव मंजू...
Continue reading
अकोला :
अकोला शहरातील धर्मदाय आयुक्त कार्यालयात 2019 साली घडलेले गवळी समाजाचे नेते किसनराव हुंडीवाले यांचे निर्घृण हत्या प्रकरण अखेर न्यायालयीन निकालास पोहोचले आहे. ...
Continue reading
अकोट तालुक्यातील आसेगाव बाजार येथील एका गरीब शेतमजूर कुटुंबातील मुलीने आपल्या कष्ट, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात (CISF) निवड होऊन यशाचे शिखर ग...
Continue reading
मूर्तिजापूर आगारात शुक्रवार (ता. १६) रोजी इंधन बचत मासिक मोहिमेचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मूर्तिजापूरचे निदेशक श्री. श्री. निघोट सर यांच्...
Continue reading
पाच दिवस चालणाऱ्या या पायदळ पालखी सोहळ्याची दैनंदिन रूपरेषा पुढीलप्रमाणे आहे—रविवारी बोरगाव मंजू येथून प्रस्थान करून अकोला येथे रात्री मुक्काम,
दिनांक १२ जानेवारी रोजी रात्री गायगाव येथे मुक्काम,त्यानंतर सकाळी गायगाव येथून प्रस्थान करून नागझरी येथे रात्री मुक्काम,नागझरी येथील गोमाजी महाराज समाधीचे दर्शन घेऊन पुढे शेगाव संत नगरी श्रीक्षेत्र येथे पालखीचा मुक्काम.शेगाव येथे कीर्तन, दर्शन व महाप्रसाद संपन्न झाल्यानंतर पालखी पुन्हा बोरगाव मंजूकडे परतीचा प्रवास करणार आहे.
या संपूर्ण सोहळ्यात लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, अबालवृद्ध भाविक, महिला सेवाधारी, भजनी मंडळे मोठ्या संख्येने सहभागी झाली आहेत. शिस्तबद्ध नियोजन, सेवाभाव आणि भक्तीचा संगम असलेला हा पायदळ पालखी सोहळा भाविकांसाठी आध्यात्मिक उर्जा देणारा ठरत आहे.हा संपूर्ण संत गजानन महाराज पायदळ पालखी सोहळासंत गजानन महाराज मंदिर सेवा समिती, लक्ष्मी नगर, बोरगाव मंजू यांच्या वतीने अत्यंत यशस्वीरीत्या आयोजित करण्यात आला असून, समितीच्या या उपक्रमाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/rajya-sabha-mp-and-mla-visit-the-residence-of-hidayat-patel-console-the-family-and-discuss-with-police-officers/