समाजसेवेचा वसा जपत गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या सौ. संध्या अनिल डाहेलकर यांना डॉ. सिंधुताई सपकाळ नारी प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. श्रीसंत गाडगेबाबा यांच्या दहा सूत्री संदेशांना जीवनध्येय मानून कार्य करणाऱ्या संत गाडगेबाबा कर्मभूमी सेवा प्रतिष्ठानच्या प्रेरणेने त्यांनी “तहानलेल्यांना पाणी आणि भुकेल्यांना अन्न” हा मानवतेचा संदेश प्रत्यक्ष कृतीत उतरवला आहे.
कानशिवनी येथील एकलव्य स्कूलच्या प्रांगणात कलाविष्कार साहित्य व सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित तिसऱ्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनात हा गौरव सोहळा पार पडला. संमेलनाध्यक्ष डॉ. प्रा. संतोष हुशे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्राप्त गझलनवाज पं. भिमराव पांजाळे यांच्या हस्ते तसेच उपस्थित मान्यवरांच्या साक्षीने सौ. डाहेलकर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौ. संध्या डाहेलकर गेल्या तीन-चार वर्षांपासून मेसच्या माध्यमातून विद्यार्थी-विद्यार्थिनींना अल्प दरात टिफिन सेवा देत आहेत. यावर्षीपासून त्यांनी ‘शिवाश्रय मेस हॉटेल’ सुरू करून भरपेट व रुचकर जेवणाची सोय उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे, गरिब, दीन-दुबळे आणि गरजू नागरिकांना त्या सदावर्ताप्रमाणे दररोज निशुल्क भोजन देत आहेत. त्यांच्या या सेवाव्रतामुळे अनेक गरजूंच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलत आहे.
Related News
नाशिकमधील सिन्नर येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणीत आलेल्या रुप...
Continue reading
महावितरणचा ‘मार्च एंड’ अॅक्शन प्लॅन: नागपूर परिमंडळात थकबाकी ‘शून्य’ करण्याचे निर्देश
नागपूर: आर्थिक वर्षाच्या अखेरीस महसूल वाढीसाठी महावितरणने कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आह...
Continue reading
मुंबई – प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणावर नवीन माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या प्रश्नोत्तरांच्या त...
Continue reading
अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील वडगाव पान परिसरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता सहावीत शिकणाऱ्या ११ वर्षीय विद्यार्थिनीवर अज्ञात नराधमाने अचानक
Continue reading
मुंबई – शिखर बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक ग...
Continue reading
अकोट तालुक्यातील टाकळी बु परिसरात रेती तस्करीची घटना गंभीर बनली आहे. मागील महिनाभरात नदी पात्रातील घाटावर रेती तस्करांनी महसूल प्रशासनाच्या नाकावर ...
Continue reading
नाशिक न्यूज: त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंपरी परिसरात एका विद्यार्थीची आत्महत्या झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे...
Continue reading
पुणे जिल्ह्यातील सासवड परिसरात रमजान महिन्यादरम्यान इफ्तारीच्या तयारीत असलेल्या मुस्लीम तरुणांसोबत धक्कादायक घटना घडली आहे. ऑस्करवाडी भागातील एका तलावाजव...
Continue reading
रामापूर (ता. अकोट) : अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या रामापूर या गट ग्रामपंचायतीत घरकुल योजनेच्या अंमलबजावणीबाबत गंभीर प्रश्न निर्माण झा...
Continue reading
राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मनसेच्या २०व्या वर्धापनदिनानिमित्त सदस्य नोंदणी मोहीम सुरु; रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन, पदाधिकाऱ्या...
Continue reading
महाराष्ट्र बजेट 2026: कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; उद्धव ठाकरेंची शेतकऱ्यांवर चिंता
फडणवीस सरकारने सादर केला अर्थसंकल्प
आज, ...
Continue reading
सामाजिक बांधिलकी जपत निस्वार्थ भावनेने केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना मिळालेला हा पुरस्कार इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी हातभार लावणाऱ्या अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वामुळे मानवतेचा दीप अधिक तेजाने प्रज्वलित होत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
read also : https://ajinkyabharat.com/priyadarshini-indalkar-off-shoulder-look-7-stunning-photos-fansna-banana-thak-glamor-blast/