मुंबई – शिखर बँक घोटाळा प्रकरणी राज्याचे दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि आमदार रोहित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विशेष न्यायालयाने आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) क्लोजर रिपोर्ट (C-Summary) अधिकृतपणे मंजूर करून या नेत्यांना क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे या प्रकरणाची फाईल अधिकृतपणे बंद झाली आहे.
शिखर बँकेच्या कथित २५ हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा भडका २०११-१२ सुमारास उफरला. या प्रकरणात राज्यातील अनेक सहकारी साखर कारखाने नियमबाह्य कर्जवाटपामुळे डबघाईला गेले, आणि अत्यंत कमी किमतीत विकल्यामुळे बँकेचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे आरोप होते. ७० हून अधिक माजी संचालकांवर आरोप ठोकण्यात आले होते, ज्यात अजित पवार, सुनेत्रा पवार आणि रोहित पवार यांचा समावेश होता.
न्यायालयाने क्लोजर रिपोर्ट तपासताना निरीक्षण केले की संबंधित संचालकांच्या कृतीमध्ये कोणतीही बेईमानी किंवा लबाडीचा हेतू दिसून येत नाही. तसेच, पूर्वनियोजित कट किंवा संगनमत करून बेकायदेशीर कृत्य केल्याचे ठोस पुरावे तपास यंत्रणेला मिळालेले नाहीत. त्यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने सादर केलेला अहवाल स्वीकारला आणि प्रकरण बंद करण्याचा निर्णय घेतला.
Related News
5000 कोटींच्या दाव्यावरून लाडकी बहीण योजना चर्चेत; सुप्रिया सुळेंचा सरकारला थेट सवाल, ‘खरी आकडेवारी कोणती?’
लाडकी बहीण योजनेत 5 हजार कोटींचा ...
Continue reading
राष्ट्रवादीचं मेगा प्लॅनिंग; सुनेत्रा पवारांचं रिलाँचिंग, 'आपल्या वहिनी आहेत ना!' कॅम्पेनची चर्चा
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आगामी काळातील राजकीय वाटचालीसाठी नव्या रणनीतीची आखणी सु...
Continue reading
Disha Salian मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका; म्हणाले, ‘मी त्यांना कधीही भेटलेलो नाही’
गेल्या सहा वर्षांपासून राजकीय हेतूने नाव जोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आदित्य...
Continue reading
रुग्णालयांकडून वैद्यकीय वस्तूंवर मोठा नफा? Tukaram Mundhe यांच्या पत्रामुळे खळबळ; काही वस्तूंवर तब्बल २८४१ टक्क्यांपर्यंत फरक
महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त
Continue reading
Manoj Jarange Patil यांच्या आंदोलनामागे राजकीय शक्ती? आशिष शेलार यांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी M...
Continue reading
शरद पवार मैदानात! ऐन गणेशोत्सवात राष्ट्रवादीची तातडीची बैठक; दुष्काळ, जरांगे आंदोलनावर होणार चर्चा
राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच
Continue reading
Manoj Jarange Patil मुंबई आंदोलन : तिसऱ्या अर्जावर निर्णय रखडला; हायकोर्टात जाण्याची शक्यता, पोलिसांच्या विशेष बैठकीत काय घडलं?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी
Continue reading
शिवसेना चिन्ह सुनावणी : शिंदे गटाच्या वकिलांचा भावनिक युक्तिवाद; ‘कार्यकर्ते हेच पक्षाचा प्राण’ म्हणत ठाकरे गटावर निशाणा
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीत नीरज कौल यांचा जोरदार युक्त...
Continue reading
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी : उद्धव ठाकरेंना धक्का देणारा शिंदे गटाचा दावा; ‘पक्षप्रमुख’ पदावरून सर्वोच्च न्यायालयात मोठा युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्व...
Continue reading
खात्यात अचानक पैसे आले… आणि अचानक गेले? सायबर फ्रॉडवर RBIचा मोठा वार; संशयास्पद व्यवहारांवर लागणार ‘डेबिट होल्ड’
RBI : डिजिटल व्यवहारांचा वाढता वापर पाहता...
Continue reading
Manoj Jarange Patilचा तिसऱ्यांदा अर्ज; मुंबई पोलिसांकडून परवानगी मिळणार का? महत्त्वाची अपडेट समोर
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी Manoj Jarange Pa...
Continue reading
Manoj Jarange Patil मुंबईकडे रवाना; पहिला मुक्काम पाटोदा, सरकारच्या भूमिकेकडे लक्ष
आंतरवाली सराटीतून ताफा मुंबईच्या दिशेने रवाना; आझाद मैदानातील उपोषणासाठी अद्याप परवानगी नाही, Ma...
Continue reading
या निर्णयामुळे पवार कुटुंबासह संबंधित सर्व नेत्यांना कायदेशीर प्रक्रियेतून पूर्णतः क्लीनचीट मिळाली आहे. याचबरोबर, अंमलबजावणी संचालनालयाची (ED) चौकशीसाठीही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले राजकीय आणि कायदेशीर वाद आता पूर्णविरामाला पोहोचले आहेत.
शिखर बँक प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठा गाजावाजा केला होता. अनेक वेळा न्यायालयीन प्रक्रिया आणि तपास यंत्रणेच्या चौकशांमुळे या प्रकरणाला सामाजिक आणि राजकीय गती मिळाली होती. परंतु, न्यायालयाच्या अंतिम निर्णयामुळे आता हे प्रकरण संपूर्णपणे क्लिअर झाले असून पवार कुटुंबाला कायदेशीर आणि मानसिक दिलासा मिळाला आहे.
read also : https://ajinkyabharat.com/the-sound-of-americas-attack-on-iran-trump-claims-7000-places-attacked-and-100-ships-destroyed/