Ratan Tata Will: मेहली मिस्त्री यांना अलिबाग बंगला भेट देताना रतन टाटा यांच्या दृष्टीकोन दिसून येतो.
त्यांनी म्हटले की, आलिबागची मालमत्ता बांधण्यात मिस्त्री यांचे मोठे योगदान आहे.
यामुळे हे ठिकाण त्यांना एकत्र घालवलेल्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून देईल.
Related News
अकोला शहरातील गुंटेवारी लेआउटचे काम लवकरच सुरू होणार; म.न.पा आयुक्तांचा विश्वास
बोरगाव मंजू येथे दोन गटात तुफान हाणामारी; तक्रार घेताना पोलिसांची एकतर्फी भूमिका?
बाळापूर ब्रेकिंग: मनारखेड दरोडा प्रकरणातील टोळी उखडली; उरळ पोलिसांची मोठी कारवाई
चित्र नगरी कोल्हापूरच्या राज्य सदस्य पदी निलेश जळमकर यांची नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार
अकोला जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; 4 जुलैपर्यंत हवामान खात्याचा अलर्ट, प्रशासन सतर्क
हिंदी सक्तीचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आंदोलनात राज ठाकरेंची उडी – प्रतापराव जाधव यांची टीका
महामार्गावर भीषण अपघात, भला मोठा कंटेनर पलटी; अफवांमुळे लुटीचा प्रयत्न, परिसरात एकच खळबळ!
एलपीजी दरात कपात: कमर्शियल सिलेंडर ५८.५० रुपयांनी स्वस्त
भोपाल कोर्टमधून चित्रपटात शोभेल अशी घटना! शिक्षा ऐकताच आरोपी कोर्टातून पळाला
अकोल्यात सिटी कोतवाली पोलिसांची कारवाई; २४ तासांत दुचाकी चोरटे जेरबंद
मन नदीत आढळला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह; बाळापूर शहरात खळबळ
मतदार यादी अचूकतेसाठी अकोट तहसील कार्यालयात बीएलओ व पर्यवेक्षकांना प्रशिक्षण
Ratan Tata Will: टाटा ग्रुपचे माजी चेअरमन रतन टाटा यांच्या
निधनास आता सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ झाला आहे.
त्यांच्या मृत्युपत्रात संपत्तीच्या वाटणीबाबत सर्व माहिती दिली आहे.
त्यांनी आपल्या संपत्तीचा सर्वात मोठा भाग दान-पुण्यकर्मासाठी खर्च केला आहे.
इकोनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार त्यांच्याकडे जवळपास 3,800 कोटी रुपयांची संपत्ती आहे.
त्यातील मोठा भाग ‘रतन टाटा एंडोमेंट फाउंडेशन’ आणि ‘रतन टाटा एंडोमेंट ट्रस्ट’ ला दिली आहे.
या संस्था सामाजिक कार्यात काम करतात. रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात
नातेवाईक, मित्र, कर्मचारी इतकेच नव्हे तर प्राण्यांचाही विचार केला आहे.
रतन टाटा यांचे 9 ऑक्टोंबर रोजी निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी केलेले मृत्यूपत्र समोर आले.
त्याच्या इतर मालमत्तेपैकी एक तृतीयांश म्हणजे सुमारे 800 कोटी रुपये ज्यात बँक एफडी, आर्थिक साधने,
घड्याळे आणि पेंटिंग यांचा समावेश आहे. त्यांच्या सावत्र बहिणी शिरीन जेजीभॉय
आणि दिना जेजीभॉय यांच्याकडे ही मालमत्ता जाणार आहे.
जुहू येथील बंगल्याचा काही भाग त्यांचा भाऊ जिमी नवल टाटा यांना देण्यात आला आहे.
त्याचवेळी त्यांचा जवळचा मित्र मेहली मिस्त्री याच्याकडे अलिबागची
मालमत्ता आणि त्याच्या तीन मौल्यवान बंदुका दिल्या.
त्यात पॉइंट 25 बोअरच्या पिस्तुलाचा समावेश आहे.
शंतनू नायडूला दिलेले कर्ज माफ
रतन टाटा यांनी त्यांच्या मृत्यूपत्रात त्यांच्या पाळीव प्राण्यांचाही विचार केला आहे.
त्या प्राण्यांसाठी त्यांनी12 लाख रुपयांचा तरतूद केली आहे.
त्यातून प्रत्येक पाळीव प्राण्याला प्रत्येक तिमाहीत ₹30,000 मिळतील.
तसेच त्यांचा मित्र आणि कार्यकारी सहाय्यक शंतनू नायडू यांना
दिलेले शैक्षणिक कर्ज माफ करण्यात आले आहे.
सेशेल्सची जमीन आरएनटी असोसिएट्स सिंगापूरला दिली जाईल.
जिमी टाटा यांना चांदीची भांडी आणि काही दागिने मिळतील.