“रानडुकरांचा घरात धुडघूस: ११ वर्षीय मुलगा जखमी”

"रानडुकरांचा घरात धुडघूस: ११ वर्षीय मुलगा जखमी"

पातुर तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र कार्यालय अंतर्गत पिंपळखुटा येथे मेहमूद शाह यांच्या घरात

अचानक ३५ ते ४० रानडुकरांनी धुमाकूळ घातल्याची घटना शुक्रवार दि.२१ फेब्रुवारी रोजीच्या सकाळी उघडकील आली,

रानडुकरांच्या धुमाकूळमुळे महेमुद शहा यांचा ११ वर्षीय मुलगा रोशन शहा जखमी झाला आहे.

Related News

पिंपळखुटा परिसरात रानडुकरांचा शेत शिवारात गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ सुरू

असल्याने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

आता रानडुकरांनी गावाकडे मोर्चा वळविल्याने गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

५ ते ४० रानडुकरांचा झुंड अचानक पिंपळखुटा येथील मेहमूद शाह यांच्या घरात घुसून धुमाकूळ घातला,

यामध्ये घरातील फ्रिज टीव्ही व हरभरा तुर आदी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुकरांचा

झुंड गावात घुसल्याने गावात एकच तारांबळ उडाली होती.रानडुकरांचा झुंड मेहमूद् शहा यांच्या घरात घुसल्याने

कुटुंबातील सदस्य भयभीत झाले झाल्याने पळापळ झाली, आणि काही ग्रामस्थांनी घराचे द्वार लावून दिले,

त्यामुळे रानडुकरांचा चार तासापर्यंत घरात धुमाकूळ सुरू असल्याने महेमूद शाह यांचे

घरातील हजारो रुपयांच्या साहित्यांचे नुकसान झाले आहे.आलेगाव वन विभागाचा अनागोंदी कारभार

शुक्रवार रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास रानडुकरांचा झुंड घरात घुसल्या

बाबतची माहिती आलेगाव वन विभागाला देण्यात आली, परंतु चार तासापर्यंत अद्यापही वन विभागाचा एकही

कर्मचारी फिरकला नव्हता तोपर्यंत गावात दहशतीचे वातावरण पसरले होते.

अखेर ४ ते पाच तासानंतर ग्रामस्थांच्या मदतीने रानडुकरांना जंगलात सोडण्यात आले..

Read more news here :  https://ajinkyabharat.com/resharcard-holder/

Related News