उत्साहात जपली जाते
विशाल आग्रे, अकोट प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार जवळ असलेल्या रेल (धारेल) गावात शेकडो वर्षांपासून चालत आलेली
महादेव आणि माता पार्वती यांच्या विवाहाची अनोखी परंपरा आजही तेवढ्याच भक्तीभावाने आणि उत्साहात पाळली जात आहे.
Related News
अकोल्यातून एक संवेदनशील आणि माणुसकी जपणारी घटना समोर आली असून, समाजात सकारात्मक संदेश देणारी ही बाब सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पोस्ट ऑफिस चौकात रस्त्यावर जखमी अवस्थेत पडलेला
Continue reading
मुंबई अंडरवर्ल्डच्या इतिहासात अनेक नावे आहेत, परंतु ७०-८० च्या दशकात जे नाव सगळ्यात जास्त आदर आणि भीतीने घेतले जात असे, ते म्हणजे हाजी मस्तान मि...
Continue reading
अक्षय खन्ना व त्याच्या वडिलांच्या खळबळजनक वक्तव्याचा इतिहास
Continue reading
अभिनेता अक्षय खन्ना आपल्या अभिनय कौशल्यामुळे आणि स्टायलिश व्यक्तिमत्वामुळे नेहमीच चाहत्यांच्या लक्षात येतात. ‘छावा’ नंतर त्याला पुन्हा एक जोरदार कमबॅक मिळालेला आहे, आणि त्याचे हे प...
Continue reading
धुरंधर चित्रपटावर अक्षय खन्नाची कमाल एण्ट्री; एक्स-गर्लफ्रेंड तारा शर्माची खास पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
अक्षय खन्ना सध्या थिएटरपासून ते सोशल मीडियापर...
Continue reading
5201314 : 2025 मध्ये भारतीय इंटरनेट वापरकर्त्यांच्या सर्चिंग पॅटर्नवर नजर टाकली असता, एक अत्यंत अनोखा ट्रेंड दिसून आला. Google च्या 'Year in Search' लिस्टमध्ये अनेक पारंपरिक शब्द, ...
Continue reading
प्राजक्ता माळी फॅन पेजवरील एआय फोटो पाहून चिडली; चाहत्यांना केली विनंती
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. तिचे लाखो चा...
Continue reading
‘Rupal Tyagi Marriage’ 2025 मध्ये झाली आणि तिचे आनंददायक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. पाहा रुपल त्यागीच्या लग्नाचे खास क्षण आणि ...
Continue reading
गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू, शहानूर–पोपटखेड रस्त्याच्या कामावर नागरिक नाराज
अकोला : गेल्या 13 वर्षांपासून विविध कारणांमुळे स्थगित झालेला
Continue reading
Bigg Boss 19 Grand Finale : बिग बॉस 19 चा भव्य ग्रँड फिनाले आज! कोण होणार विनर? कुठे आणि किती वाजता पाहाल शो?
Bigg Boss 19 Grand Finale : देशातील...
Continue reading
‘कुबूल है’ ते ‘सात फेरे’पर्यंत! बिग बॉस फेम सारा खानचा कृष्ण पाठकसोबत दोन्ही परंपरांत विवाहसोहळा
टेलिव्हिजन आणि रिअॅलिटी शो बिग बॉसमधून प्रेक्षकांच्या परिचयाला आलेली लोकप्रिय अभिन...
Continue reading
ही ऐतिहासिक परंपरा आदिवासी कोळी महादेव जमातीने पिढ्यान्पिढ्या जपली असून,
रेलेश्वर संस्थानच्या वतीने दरवर्षी चैत्र नवमीच्या दिवशी मोठ्या भक्तिभावात हा विवाह सोहळा साजरा केला जातो.
यावर्षी हा सोहळा शनिवार, ५ एप्रिल रोजी पार पडणार आहे.
वास्तविक विवाहासारखा भव्य सोहळा
या विवाह सोहळ्यात खऱ्याखुऱ्या लग्नाप्रमाणेच वधू-वर पक्षातील पाहुणे, वाजंत्री,
मंगलाष्टके, स्वागत समारंभ, मान-सन्मान, जेवणावळी अशा सर्व विधी मोठ्या थाटात पार पडतात.
या सोहळ्यात इंगळे कुटुंबाकडे माता पार्वती (वधू) आणि घुगरे कुटुंबाकडे भगवान महादेव (वर) यांचा मान असतो.
या दोन्ही कुटुंबांकडे याबाबतचा पारंपरिक सन्मान कायम आहे.
विदर्भ ते कोकण – सर्वत्रून आदिवासी बांधवांची उपस्थिती
या दिवशी रेल गावात विदर्भासह कोकण, मुंबई, पुणे, मराठवाडा, जळगाव-खान्देश आदी
भागांतून शेकडो आदिवासी कोळी बांधव उपस्थित राहतात.
तरुण-तरुणी, महिला मोठ्या संख्येने या धार्मिक व सांस्कृतिक उत्सवात सहभागी होतात.
ऐतिहासिक रेलेश्वर मंदिर आणि परंपरेचे वैभव
या लग्न सोहळ्याचे मुख्य केंद्र म्हणजे रेलेश्वर मंदिर, जे शंकर-पार्वतीच्या मूर्तींसह प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिर आहे.
या मंदिराचा दोन वेळा जिर्णोद्धारही करण्यात आला आहे.
महादेव-पार्वतीच्या विवाहाचे हे प्रतीकात्मक रूप आदिवासी समाजासाठी श्रद्धा,
एकता आणि सांस्कृतिक जतनाचे प्रतीक ठरले आहे.
संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घुगरे यांची माहिती
या कार्यक्रमाचे आयोजन रेलेश्वर संस्थान आणि स्थानिक समिती करत असून,
संस्थेचे अध्यक्ष सुधाकर घुगरे यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाही हा विवाहसोहळा मोठ्या थाटात पार पडणार आहे.