आजपासून रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद!

किल्ले रायगड

किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस

किल्ले रायगडावर रविवारी संध्याकाळी ढग फुटी प्रमाणे पाऊस कोसळला.

यामुळे किल्ले रायगडाच्या पायरी मार्गाला ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते.

Related News

ओढ्यातून ज्याप्रमाणे खळाळून पाणी वहाते

त्याप्रमाणे अतिशय अक्राळविक्राळपणे पायरी मार्गावरून पाणी वहात होते.

तर बुरुज आणि कड्यांवरून अक्षरशः धबधब्याप्रमाणे पावसाचे पाणी वाहिले.

ही भयानक परिस्थिती किल्ले रायगडाच्या

महादरवाजा परिसरात निर्माण झाली होती.

यावेळी मोठ्या संख्येत पर्यटक शिवप्रेमी रायगडावर होते.

अनेक पर्यटक या दरम्यान तारेवरची कसरत करत

वहात्या पाण्यात आडकून पडले.

त्यातील एका पर्यटकाने रायगडवरील ढग फुटीचे मोबाईल चित्रिकरण केले.

ते व्हायरल झाले आहे.

दरम्यान पावसाचे स्वरुप लक्षात घेता ८ जुलै पासून

म्हणजेच आजपासून रायगड किल्ला पर्यटकांकरिता बंद करण्यात आलेला आहे.

रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग

बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे,

यासाठी पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/dhavanar-225-bus-from-buldana-district-to-ashadhi/

Related News