हिवरखेड मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा

देवेंद्र फडणवीस

तेल्हारा : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अकोट तेल्हारा व हिवरखेड नगरपरिषद निवडणुकीच्या  प्रचारार्थ  मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यात  जाहीर सभा हुत असून  त्यांची हिवरखेड येथील देशमुख नगर बसस्टॅड येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी तीनही नगराध्यक्ष पदाचे भाजपा उमेदवार  सुलभाताई रमेश दुतोंडे, मायाताई धुळे, वैशाली पालीवाल  उपस्थित होते , उमेदवारासह नगरसेवकांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सबोंधित करण्यासाठी आमदार रणधीर सावरकर खासदार अनुप धोत्रे अॅड आकाश फुंडकर पालकमंत्री तसेच अकोट विधानसभेचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या नेतृत्वाखाली सभेला पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. जाहीर सभेत २५ हजार पेक्षा जास्त नागरिक उपस्थित राहणार असा अंदाज रमेश भाऊ दुतोंडे,किरण भाऊ सेदानी यांनी केला असून ७८ नगरसेवकांच्या प्रचारार्थ सभेसाठी येणार आहेत या दृष्टीने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आले आहे विजय अग्रवाल भाजपा जिल्हा अध्यक्ष संतोष शिवरकर डॉक्टर अमित कावरे माधव मानकर डॉ संजय शर्मा, रमेश दुतोंडे, किरण सेदाणी, उमेश पवार राजेश रावणकर हरीश टावरी गोपाल मोहोळ मंगेश दुंतोडे गणेश रोठे, संदीप उगले संदीप पालीवाल डॉक्टर संजय शर्मा संजय जोशी, बाळासाहेब नेरकर, सुदाम राऊत सह विविध कार्यकर्त्यांकडे जबाबदारी देण्यात आल्या आहेत.

भाजपाने प्रचारार्थ आघाडी घेतली असून भारतीय जनता पक्षाने आणि हिवरखेड येथील भाजपचे कार्यकर्ते सभेच्या तयारीत गुंतले आहेत. सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पक्षातर्फे करण्यात येत आहे.

read also : https://ajinkyabharat.com/5-reasons-why-black-dust-is-coming-out-of-your-car-important-precautions-for-the-car/

Related News

Related News