पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर; विकास कामांचे करणार लोकार्पण

लोकसभा

लोकसभा निवडणुकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदाच

मुंबई दौऱ्यावर आहेत.

पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आज संध्याकाळी पार पडणार आहे.

Related News

पंतप्रधान मोदी कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे आणि बोगद्याचे उद्घाटन करतील.

यात लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स स्टेशनवरील

नवीन प्लॅटफॉर्मचे उद्घाटन, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता प्रकल्पाचे उद्धाटन,

ठाणे-बोरिवली जुळ्या बोगद्याच्या प्रकल्पाचे भूमीपूजन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.

पंतप्रधान मोदी आज संध्याकाळी 5:30 वाजता गोरेगाव येथील नेस्को प्रदर्शन केंद्रात पोहोचतील,

जिथे ते मुंबईतील वाहतूक कनेक्टिव्हिटीशी संबंधित प्रकल्पांचे लोकार्पण करतील.

रेल्वे, रस्ते आणि बंदर क्षेत्राशी संबंधित प्रकल्पांना ते हिरवा झेंडा दाखवतील.

त्यानंतर ते संध्याकाळी 7 वाजता पंतप्रधान मोदी

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील भारतीय वृत्तसेवा (INS) सचिवालयाला भेट देतील.

पंतप्रधानांच्या दौऱ्यात ते अनेक मोठ्या प्रकल्पांना चालना देणार आहेत.

या दौऱ्यात त्यांच्या हस्ते 16,600 कोटी रुपयांच्या ठाणे-बोरिवली

बोगद्याच्या प्रकल्पाची पायाभरणी होणार आहे.

या बोगद्यामुळे प्रवासाचा सुमारे 1 तासाचा वेळ वाचणार आहे.

6,300 कोटी रुपयांच्या गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचेही मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे.

या प्रकल्पामुळे प्रवासाचा वेळ सध्याच्या 75 मिनिटांवरून 25 मिनिटांवर येणार आहे.

आज पंतप्रधान हे 5,600 कोटी रुपयांची

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना देखील सुरू करतील.

तरुणांची बेरोजगारी दूर करणे आणि 18 ते 30 वयोगटातील लोकांना

रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आहे हे त्याचे उद्दिष्ट आहे.

Read also: https://ajinkyabharat.com/munna-bhaichi-entry-in-housefull-5-movie/

Related News