फुलंब्री : फुलंब्री मतदारसंघात भाजपच्या विविध कार्यक्रमांमध्ये आमदार अनुराधा चव्हाण यांच्यासोबत त्यांच्या पती, सार्वजनिक बांधकाम विभागातील मुख्य अभियंता अतुल चव्हाण यांचेही छायाचित्र मोठ्या प्रमाणावर जाहिरात व बॅनरवर वापरले जात असल्याचे उघड झाले आहे.अतुल चव्हाण यांनी या बाबतीत थेट पत्राद्वारे पत्नी अनुराधा चव्हाण यांच्यासमोर आपली तक्रार मांडली आहे. पत्रात त्यांनी स्पष्ट म्हटले आहे की, “आपल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी माझा फोटो वापरणे थांबवावे आणि माझे नाव किंवा छायाचित्र पक्षाच्या बॅनरवर किंवा जाहिरातीवर टाकणे टाळावे.”
प्रशासनिक आचारसंहितेचा संदर्भ
अतुल चव्हाण यांच्या पत्रामुळे फुलंब्री मतदारसंघात राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अधिकारी असलेल्या पतीने थेट आमदार पत्नीला सूचना दिल्यामुळे हा मुद्दा फक्त कौटुंबिक नव्हे, तर प्रशासनिक आचारसंहितेचा संदर्भ घेऊनही चर्चा रंगली आहे.
पत्रातील आशय
पत्रात म्हटले आहे की, “उपरोक्त विषयी सादर करण्यात येते की, आपल्या फुलंब्री मतदार संघातील आपले कार्यकर्ते हे माझे (अतुल भि.चव्हाण) छायाचित्र विविध वृत्तपत्रात तसेच बॅनरवर प्रसिध्द करत आहेत. त्यामुळे माझ्या विरुध्द तक्रारी तसेच माहिती अधिकार अर्ज या कार्यालयास प्राप्त होत आहेत. तरी, आपणांस विनंती करण्यात येते की, माझे छायाचित्र विविध वृत्तपत्रात तसेच बॅनरवर प्रसिध्द न करण्याबाबत आपल्यास्तरावरून आपल्या मतदार संघातील कार्यकर्त्यांना सूचना देण्यात याव्यात.”
Related News
शिवसेना पक्ष आणि चिन्ह वादावर प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; म्हणाले, ‘भाजपचाच राजकीय फायदा होईल’
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून सुरू असलेल्या कायदेशीर संघर्षाकडे सध्या...
Continue reading
आमदारांना कार, इंधन, ड्रायव्हरसाठी दरमहा 75 हजार; मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय
तमिळनाडूच्या राजकारणात सध्या मुख्यमंत्री आणि अभिनेते थलपती विजय यांच्या एका निर्णयाची जोरदार च...
Continue reading
छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांच्या BLO ड्युटीवरून सरपंच मंगेश साबळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. आत्मदहनाचा इशारा, घोषणाबाजी आणि जिल्हाधिकाऱ्यांना आव्हान दिल्यानंतर ...
Continue reading
आमदार धीरज लिंगाडेंची पहिली स्पष्ट प्रतिक्रिया
धीरज लिंगाडे : राज्यातील राजकारणात सध्या मोठ्या घडामोडींना वेग आला असून पक्षांतर, बंडखोरी आणि राजकीय दाव्यांमुळे वातावरण तापले आहे. ...
Continue reading
मुंबई : राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला असून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात आमदार-खासद...
Continue reading
35 कोटींचं आमिष, थलपती विजय सरकार पाडण्याचा कथित कट; 3 जण अटकेत
थलपती विजय सरकारविरोधातील मोठा खुलासा; 3 जण अटकेत
तमिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. राज्...
Continue reading
सरकार पाडण्याचा कट उधळला? 15 आमदारांना 50 कोटींची ऑफर दिल्याचा दावा; तामिळनाडूच्या राजकारणात मोठी खळबळ
देशातील राजकारणात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्...
Continue reading
आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप; काय आहे संपूर्ण प्रकरण?
Kolhapur News: कोल्हापूरच्या राजकारणात एका कथित व्हायरल व्हिडीओमुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आह...
Continue reading
शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप? 40 आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा; रोहित पवारांच्या विधानाने राज्यात खळबळ
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन...
Continue reading
बच्चू कडू आमदार विधान: शेतकऱ्यांचे प्रश्न आणि राजकीय वाद
बुलढाणा जिल्ह्यातील पातुर्डा गावात आयोजित राज्यव्यापी शेतकरी हक्क परिषदेमध्ये भाजपा विरोधी नेते आणि शेतकरी नेते बच्चू कडू ...
Continue reading
पीक विम्या संदर्भात आता उबाठा शिवसेना आक्रमक झाली आहे.अकोल्यातील बाळापूर मतदार संघाचे शिवसेना उबाठा गटाचेआमदार नितीन देशमुख यांनी बाळापूर नगर परिषद हॉलमध्येकृषी अधिकारी...
Continue reading
तामिळनाडू विधानसभेतून मोठी बातमी समोर आली आहे.तामिळनाडू विधानसभ...
Continue reading
ग्रामीण भागातील पती-पत्नीचे कामकाज
ग्रामीण भागातील सर्रास दृश्य असे आहे की, पत्नी पुढारी असते, पण कारभार पती पाहतो. अनेकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील महिला आरक्षणाचा फायदा घेऊन महिला सरपंच पदावर विराजमान होतात, तरीही वास्तविक प्रशासनिक काम पती हाताळतात. फुलंब्रीतही अशीच परिस्थिती दिसून येते.सध्या सोशल मीडियावर हे पत्र जोरदार व्हायरल झाले असून, राजकीय आणि प्रशासनिक वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/794-cubic-meters-per-second-paani-nadi-sodle/