पातूर तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक ?

पातूर तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक ?

बोगस सोयाबीन बियाण्याचे वितरण; चौकशीची मागणी.

पातूर तालुक्यातील आलेगाव येथील

शेतकरी निलेश तोताराम कापकर यांनी

Related News

कृषी विभागाविरोधात गंभीर तक्रार दाखल केली आहे.

२०२५ च्या खरीप हंगामासाठी १००% अनुदानित

स्वरूपात ऑनलाईन सोडतीद्वारे वितरित करण्यात

आलेल्या सोयाबीन बियाण्यांमध्ये गंभीर

अनियमितता आढळल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

कापकर यांनी दिलेल्या निवेदनानुसार,

त्यांच्या वडिलांना (तोताराम नामदेव कापकर) मिळालेली

बियाणे पिशवी पूर्णतः निकृष्ट, बुरशीग्रस्त व अंकुरणशक्ती

नगण्य अवस्थेत असल्याचे प्रत्यक्ष पाहणीमध्ये स्पष्ट दिसून आले.

ही बाब केवळ त्यांच्यापुरती मर्यादित नसून,

पातूर तालुक्यातील इतरही अनेक शेतकऱ्यांना अशाच प्रकारचे

या गंभीर प्रकारामुळे पातूर तालुक्यातील शेतकरी

वर्गात असंतोषाची भावना पसरली असून,

कृषी विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे

अत्यंत आवश्यक झाले आहे.

– डॉ. राहल वानखडे, तहसीलदार पातुर

सदर तक्रारीवर कृषी विभागातील वरिष्ठांसोबत चर्चा केली आहे.

आणि त्यावर प्रस्तावित चौकशी करण्याचे सांगितले आहे.

निलेश कापकर, शेतकरी आलेगाव

बोगस बियाणे वाटप झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

कायद्यानुसार गंभीर उल्लंघनः

बीज अधिनियम १९६६ व बियाणे नियंत्रण

आदेश १९८३ यांनुसार अशा बोगस बियाण्यांचे वितरण हा दंडनीय गुन्हा आहे.

प्रमुख मागण्या

तात्काळ चौकशी करून दोषी एजन्सी व अधिकाऱ्यांवर

फौजदारी कारवाई.

बियाण्याची प्रयोगशाळेच्या माध्यमातून वैज्ञानिक तपासणी व अहवाल प्रसिद्ध.

शेतकऱ्यांना संपूर्ण नुकसान भरपाई बियाण्याची किंमत,

पेरणी व मजुरी खर्चासह.

भविष्यातील अशा फसवणुकीस आळा घालण्यासाठी कठोर

उपाययोजना.

“जर आमच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत,

तर पातूर तालुक्यातील शेतकरी संघटीत होऊन तीव्र

आंदोलन छेडतील,” असा इशारा निलेश कापकर यांनी दिला आहे.

या गंभीर प्रकारामुळे पातुर तालुक्यातील शेतकरी

वर्गात असंतोषाची भावना पसरली आहे.

त्यामुळे कृषी विभागाने याकडे गांभीर्याने

लक्ष देऊन यावर चौकशी करणे गरजेचे आहे.

 

Related News