इस्लामाबाद (३ मे):
पाकिस्तानमध्ये भूकंपाचे धक्के बसण्याची मालिका सुरुच असून, गेल्या आठवड्यात ही तिसरी वेळ आहे.
सोमवारी खैबर-पख्तूनवा प्रांतासह अनेक शहरांमध्ये भूकंपाचे झटके जाणवले.
Related News
कुंभारी एक छोटसं गाव फार तर तिथे जायला अकोल्यावरूनदहा मिनिट लागतील.
एक जुलै 1977 रोजी एका तुकाराम बिडकर नावाच्या ध्येय वेड्या व्यक्तीने जय बजरंग व्यायाम शाळेची स्थापना केली.
...
Continue reading
मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भात
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची बैठक मुर्तीजापुर येथे आयोजित करण्यात आली होती.
या बैठ...
Continue reading
अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांची कर्जमाफी, पिकाला हमीभाव यांसह विविध १७ मागण्यासाठी प्रहार जनशक्ती
पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री बच्चू कडू यांचे मोझरी येथे बेमुदत अन्नत्याग आंदोलन ...
Continue reading
राज्य सरकारने पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण व डोंगराळ भागातील नागरिकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
जून ते ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या संभाव्य वाहतूक अडचणींचा विचा...
Continue reading
प्रतिनिधी | अहमदाबाद
अहमदाबादमध्ये शनिवारी झालेल्या भीषण एअर इंडिया विमान अपघातावर केंद्र सरकारकडून मोठा खुलासा करण्यात आला आहे.
उड्डयन मंत्री राम मोहन नायडू यांनी पत्रकार परिषदे...
Continue reading
नवी दिल्ली | प्रतिनिधी
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) २०वा हप्ता लवकरच म्हणजे २० जून २०२५ रोजी पात्र
शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिले...
Continue reading
समधितांचे अर्थपूर्ण दूर लक्ष
माल वाहतूक दारावर उपास मारीची पाळी
सध्या संपूर्ण भारतात घरकुल योजने अंतर्गत मोठ्या प्रमाणावर गावोगावी घरकुल मंजूर झाले
आणि नुकतीच पाऊसल्याला स...
Continue reading
अकोट शहर प्रतिनिधी... राजकुमार वानखडे ..
अकोट तालुक्यातील प्रसिद्ध असलेले संत नगरी मुंडगाव येथील अण्णाभाऊ साठे या नावाने प्रसिद्ध असलेला
आठवडी बाजार मध्ये घाणीचे साम्राज्य पस...
Continue reading
अकोल्यात प्रादेशिक परिवहन विभागातर्फे रोड सेफ्टी व्हिजन या वाहनाद्वारे वाहतूक नियमांबाबत अकोला
शहरात ठिकठिकाणी जनजागृती करण्यात येत आहेय.. शहरातील रस्त्यावर चलचित्रद्वारे वाहन
...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या बोर्डी,रामापूर,शिवपूर,शेत शिवारात गुरुवारी दुपार
नंतर आलेल्या वादळी वारा,पाऊस,व गारपीटीने बोर्डी सह आज...
Continue reading
अकोट तालुका प्रतिनिधी
काही क्षणांत संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते.मात्र अशा कठीण प्रसंगी धैर्य,मायेची
उब आणि देवाची कृपा लाभली,तर चमत्कारही शक्य होतो याचे प्रत्यंतर नुकत्याच...
Continue reading
अकोल्याच्या जुने शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळापुर मार्गावरील हेरिटेज हॉटेलमध्ये लग्नसमारंभ पर्ससह
2 लाख 43 सोन्याचे दाग दागिने आणि रोख रक्कम लंपास केल्याची घटना गुरुवारी सम...
Continue reading
राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, यावेळी भूकंपाची तीव्रता 4.2 रिश्टर स्केलवर नोंदवली गेली.
भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता.
अचानक जमिनीखालून हादरे बसल्यानं घाबरलेले नागरिक रस्त्यांवर आणि मोकळ्या जागांकडे धावत सुटले.
सुदैवाने, अद्याप कोणत्याही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.
३० एप्रिलला 4.4 तीव्रतेचा भूकंप, ३ मे रोजी अफगाणिस्तानही हादरलं
या भूकंपाआधी, ३० एप्रिल २०२५ रोजी पाकिस्तानमध्ये 4.4 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता.
त्याचप्रमाणे ३ मे रोजी अफगाणिस्तानात 4.3 तीव्रतेचा झटका बसला होता.
त्या भूकंपाचं केंद्र 15 किलोमीटर खोलवर असल्याची नोंद नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीने (NCS) केली आहे.
गेल्या सात दिवसांत पाकिस्तानमध्ये तीन वेळा भूकंप झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
एप्रिलमध्येही हादरला पाकिस्तान — 5.5 तीव्रतेचा झटका
याआधी १२ एप्रिलला पाकिस्तानच्या काही भागांमध्ये 5.5 रिश्टर तीव्रतेचा भूकंप झाला होता.
या झटक्यामुळे अनेक इमारती हलल्या आणि नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली होती. या घटनांमुळे देशात नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
टेक्सास आणि गुजरातलाही भूकंपाचा धक्का
पश्चिम टेक्सासमध्येही शनिवारी रात्री (स्थानिक वेळेनुसार) 5.3 तीव्रतेचा भूकंप झाला.
हा भूकंप न्यू मेक्सिकोतील व्हाइट्स सिटीपासून सुमारे ३५ मैल दक्षिणेला झाला.
या परिसरात लोकवस्ती कमी असल्यामुळे नुकसान तुलनेने कमी झालं, अशी माहिती अमेरिकन भूगर्भशास्त्र संस्थेने (USGS) दिली आहे.
गुजरातमध्ये २ मे रोजी रात्री उशिरा 3.4 तीव्रतेचा भूकंप झाला. केंद्र बनासकांठा जिल्ह्यातील वाव जवळ होतं.
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानुसार (GSDMA), या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी,
गुजरात हा भूकंपदृष्ट्या अतिजोखमीचा भाग असून गेल्या २०० वर्षांत नऊ मोठ्या भूकंपांचा अनुभव राज्याने घेतला आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/subdivisional-officer-missing-kotwal-dhadadver/