पहलगाम हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर; अकोल्यात विश्व हिंदू परिषदेचा जल्लोष

पहलगाम हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर; अकोल्यात विश्व हिंदू परिषदेचा जल्लोष

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्यानंतर अखेर भारताने ठोस कारवाई

करत पाकिस्तान व पीओकेमधील (पाकव्याप्त काश्मीर) दहशतवादी तळांवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर हवाई हल्ले केले.

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या नऊ ठिकाणांवर अचूक स्ट्राईक करत त्यांचा खात्मा केला.

Related News

या ठोस आणि निर्णायक कारवाईनंतर संपूर्ण देशभरात तसेच राज्यातही आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक

ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे. अकोल्यात देखील याचा परिणाम दिसून आला.

अकोल्यातील अग्रेसन चौकात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला.

या वेळी फटाक्यांची आतिषबाजी करत पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

नागरिकांनी “भारत माता की जय”, “पाकिस्तान मुर्दाबाद”,

“जय हिंद, जय सेना” अशा घोषणा देत भारतीय सैन्याच्या धाडसाचे व पराक्रमाचे अभिनंदन केले.

या जल्लोषाद्वारे अकोल्यातील नागरिकांनी दहशतवादाच्या विरोधात

आणि भारतीय सेनेच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे निदर्शित केले आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/bharitachaya-air-strikentar-chinachi-turkali-pakistanla-restraint/

Related News