पहलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक सुखरूप परतले

पहलगाम हल्ल्यानंतर अकोल्याचे ३१ पर्यटक सुखरूप परतले

अकोला :

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अडकलेले अकोल्याचे ३१

पर्यटक अखेर सुखरूप मायगावी परतले आहेत. गुरुमाऊली टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून गेलेले

Related News

हे पर्यटक पहलगाममध्ये हल्ल्यानंतर अडकल्याने त्यांची चिंता वाढली होती.

केंद्र, राज्य व स्थानिक प्रशासनाच्या सहकार्याने त्यांच्या सुरक्षित परतीची व्यवस्था करण्यात आली.

हे सर्व पर्यटक काल मुंबईत पोहोचले होते. त्यानंतर आज सकाळी स्पेशल बसने त्यांना अकोल्यात आणण्यात आले.

अकोल्यात पोहोचल्यावर भाजप आमदार रणधीर सावरकर आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले.

पर्यटकांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाचे आभार मानले. आपल्या जवळच्या माणसांना पाहून पर्यटक भावूक झाले.

पर्यटकांनी सांगितले की, काश्मीर प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी देखील त्यांना मोठे सहकार्य केले.

यावेळी आमदार रणधीर सावरकर यांनी भाजप खासदार अनुभव ढोत्रे आणि आशिष शेलार यांचे विशेष आभार मानले.

Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-mumbai-expressver/

Related News